Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहरात नाताळ सण उत्साहात साजरा…. !

Dec 25, 2021

नाताळ हा ख्रिश्चन बांधवांचा वर्षातील सर्वात मोठा उत्सव आहे. ईसाई बांधव या सणाला मोठया उत्साहाने साजरा करतात. ख्रिस्ती बांधवांचा हा सण दरवर्षी 25 डिसेंबरला सर्वत्र साजरा होतो. या दिवशी प्रभु ईसा मसीह यांचा जन्म झाल्याचे सांगण्यात येते.

येशु ख्रिस्त एक महान व्यक्ति होते त्यांनी समाजाला प्रेमाची आणि मानवतेची शिकवण दिली. येशुख्रिस्तांनी जगभरातील जनतेला प्रेमाने आणि सद्भावनेने राहण्याचा संदेश दिला. येशुंना देवाची एकमेव संतान मानले जाते. त्याकाळातील शासन कर्त्यांना येशुख्रिस्तांचा हा संदेश पसंत पडला नाही त्यामुळे त्यांनी येशु ख्रिस्तांना सुळावर लटकवले आणि मारून टाकले. त्यानंतर येशु ख्रिस्त पुन्हा जिवंत झाल्याचे ख्रिश्चन बांधव मानतात.
नाताळ च्या सणाला ख्रिस्ती बांधव आपल्या घराला अतिशय सुरेख पध्दतीने सजवितात.नाताळच्या दिवशी चर्च मधे विशेष प्रार्थना होते. माणसं आपल्या नातेवाईंकांना आणि मित्रमंडळींना भेटण्याकरता एकमेकांकडे जातात, भेटवस्तुचे आदानप्रदान होते.
ख्रिसमसच्या दिवशी आपल्या अंगणात ख्रिसमस ट्रि लावल्या जातात त्याला देखणं रूप दिलं जातं. घरावर रोषणाई केली जाते.

मनमाड शहरात देखील ख्रिस्ती बांधवांकडून आज नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील संत बार्णबा चर्च , संत फ्रांन्सिस झेवियर्स चर्च , बेथेल चर्च आणि शहरातील इतर चर्च मध्ये देखील नाताळ निमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई करून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरातील ख्रिस्ती बांधवांनी चर्च मध्ये जाऊन विशेष प्रार्थना करून एकमेकांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या , यावेळी लहान मुलांना भेटवस्तु देखील देण्यात आल्या. चर्च परिसरामध्ये प्रभु येशु यांचा जन्माचा सुंदर देखावा देखील सादर करण्यात आला.

अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड - मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे स्व.लोकमान्य टिळक यांच्या 168 व्या जयंती तथा व स्व.अण्णाभाऊ...

read more
मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

प्रतिनिधी मनमाड - येथील मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेमध्ये मंडळ श्रीमती इती पांडे...

read more
राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

  नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]