Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाडचा पारा १२ अंशावर, मनमाडकर गारठले

Dec 30, 2021

दिवसभर थंडगार हवा आणि वातावरणातील गारठ्यामुळे मनाडकरांना अशरक्ष : हुडहुडी भरली , गुलाबी थंडीने मनमाड परिसर गारठला आहे . किमान तापमानाचा पारा १२ अंशा पर्यंत घसरला आहे . त्यामुळे मनमाडकर वाढत्या थंडीचा सुख:द आनंद घेत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सकाळपासून वातावरणात कमालीचा गारठा जाणवत आहे.त्याचा परिणाम बाजारपेठेवर जाणवला , नागरिकांना दिवसभर गरम कपडे परीधान करावे लागत आहे . गेल्या दोन दिवसांपासून थंडीच्या प्रमाणात गार वाऱ्यात जास्त वाढ झाली आहे . वाढत्या थंडीचा व्यायाम आणि पर्यावरणप्रेमी आस्वाद घेत आहे . तर सकाळी कामावर जाणारे चाकरमाने आणि शालेय विद्यार्थ्यांना मात्र कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे .शहरातील विविध मैदानावर आणि मोकळ्या रस्त्यावर विविध व्यायाम करण्यासाठी व्यायामप्रेमी सरसावले आहेत . अवकाळी पावसाने उघडीप दिल्यानंतर शहर आणि परिसरात गेल्या आठवड्याभरापासून कमाल आणि किमाल तापमानात घसरण होऊ लागली . त्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे . ऐरवी आणि रात्री पहाटे असणारी थंडी आता दिवसाही जाणवू लागली . नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी कान टोपी , उपरणे , मौजे , स्वेटर आदी वस्तुंचा वापर करतांना दिसून येत आहे . वाढत्या थंडीमुळे शेकोट्या पेटू लागल्या आहे . मात्र ही थंडी रब्बी पिकांना लाभदायक असल्याने शेतकरी सुखावला आहे . या वातावरणाचा रब्बी हंगामातील , गहू , हरभरा , कांदा , ज्वारी या पिकांबरोबर फळ बागांना लाभ होणार आहे .

अजून बातम्या वाचा..

जय भवानी व्यायामशाळेच्या वीणाताई आहेर व आकांक्षा व्यवहारे ला राष्ट्रीय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक

जय भवानी व्यायामशाळेच्या वीणाताई आहेर व आकांक्षा व्यवहारे ला राष्ट्रीय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक

इंदोर मध्यप्रदेश येथे सुरु असलेल्या पाचव्या राष्ट्रीय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेची सुरवात 40...

read more
मनमाडचे प्रसिद्ध उद्योजक अजित सुराणा यांना पुणे विद्यापीठाचा जीवन साधना पुरस्कार जाहीर

मनमाडचे प्रसिद्ध उद्योजक अजित सुराणा यांना पुणे विद्यापीठाचा जीवन साधना पुरस्कार जाहीर

श्री नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संस्थेच्या प्रबंध समितीचे अध्यक्ष श्रीमान मा. अजितभाऊ सुराणा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]