loader image
[ays_poll id=7]

अभिनेत्री पूजा सावंत, चिन्मय उदगीरकर यांना सुविचार गौरव पुरस्कार : नाशिकमध्ये होणार सन्मान !

Dec 31, 2021

सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत आणि सुप्रसिद्ध अभिनेता चिन्मय उदगीरकर यांना नाशिकमधील अत्यंत मानाचा समजला जाणारा सुविचार गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. समाजाच्या विविध क्षेत्रात अविरतपणे काम करणाऱ्या मान्यवरांचा या पुरस्काराने सुविचार मंचतर्फे गौरव करण्यात येतो.

२ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वा.नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृहात हा सोहळा पार पडणार आहे.

कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चित्रपट अभिनेत्री पूजा सावंत यांची सुविचार गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनेते चिन्मय उदगीरकर यांना सुविचार गौरव विशेष पुरस्काराने सन्मानित येणार आहे. हेमंत राठी यांना जीवन गौरव पुरस्काराने तसेच कोरोना काळातील रुग्ण सेवेसाठी डॉ. अतुल वडगांवकर (वैद्यकीय), निवृत्त प्राचार्य मधुकर कडलग (शैक्षणिक), जेष्ठ साहित्यिक प्रा. शं. क. कापडणीस (साहित्य), नितीन महाजन (प्रशासन), महाराष्ट्र महिला क्रिकेट संघातील खेळाडू ईश्वरी सावकार (क्रीडा), किशोर खैरनार (कृषी) यांनाही सुविचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. 

अजून बातम्या वाचा..

बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाचा दिलासा – इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्याला मिळणार गुण

बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाचा दिलासा – इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्याला मिळणार गुण

सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या पेपरमधील त्रुटींबाबत महत्त्वपूर्ण...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास मराठी भाषा दिना निमित्ताने नामदेवराव गिडगे यांचे कडून रुपये 15000/-किंमतीची ग्रंथ/पुस्तके भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास मराठी भाषा दिना निमित्ताने नामदेवराव गिडगे यांचे कडून रुपये 15000/-किंमतीची ग्रंथ/पुस्तके भेट

मनमाड शहराचे सांस्कृतिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे हे ब्रीद वाक्य घेऊन शतकोत्तर...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे मनमाड शहराध्यक्ष सादिक पठाण यांचा ही राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र

राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे मनमाड शहराध्यक्ष सादिक पठाण यांचा ही राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र

राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे मनमाड शहराध्यक्ष सादिक रशिद पठाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला...

read more
.