loader image
[ays_poll id=7]

सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट चे भक्तांना आवाहन !

Jan 3, 2022


मागील २ वर्षांपासून सुरू असलेला कोविड-१९ अनुषंगिक साथीचा आजार व त्या संबंधित संसर्ग टाळणेकामी केंद्र व राज्य शासन विविध सूचना व मार्गदर्शक तत्वे तसेच आदेश जारी करुन सदर आजाराचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. पर्यायी समाजातील सर्व घटकांना केंद्र व राज्य शासनाच्या आदेशांचे तंतोतंत पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

विश्वस्त संस्थेच्या वतीने कोविड-१९ अनुषंगिक बाबींची पूर्तता करतांना केंद्र व राज्य शासनाच्या सर्व आदेशांशी पूर्तता केली असली तरी गर्दीच्या नियोजनात भाविकांचे आवश्यक ते सहकार्य मिळणे हेतूने विश्वस्त संस्थेने www.ssndtonline.org संकेस्थळावर ई दर्शन पास उपलब्ध करून दिले आहे. भाविकांनी ई-दर्शन / ऑनलाईन दर्शन पासच्या माध्यमातून दर्शन सुविधा उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे.

मा. जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या आदेशानुसार निर्धारित केलेल्या प्रक्रिये प्रमाणे व विश्वस्त संस्थेकडे प्राप्त सूचना विचारात घेता.

सर्व भाविक, कर्मचारी वर्ग, स्थानिक ग्रामस्थांना विश्वस्त संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात येते की, श्री भगवती मंदिरात दर्शन व्यवस्थे बाबत खालील बाबींची पूर्तता होणे अत्यंत आवश्यक आहे. तरी सर्वांनी आवश्यक ते सहकार्य देवू करावे. ही नम्र विनंती.

१. कोविड-१९ अनुषंगिक लसीकरणाचे किमान १ किंवा २ डोस पूर्ण केलेल्या भाविकांना श्री भगवती मंदिरात प्रवेश उपलब्ध आहे. ज्या भाविकांना श्री भगवती मंदिर दर्शन रांगेत रोप वे अथवा पायी मार्गे प्रवेश करावयाचा असेल त्यांना लसीकरणाचे तपशील प्रवेशद्वारावर उपस्थित कर्मचारी वर्गाला सादर करणे अथवा दाखविणे बंधनकारक आहे.

२. वय वर्ष १० पेक्षा कमी तसेच वय वर्ष ६५ पेक्षा अधिक वयाच्या भाविक तसेच ग्रामस्थ यांना श्री भगवती मंदिरात प्रवेश उपलब्ध नसेल, पर्यायी संबंधित वयोगटातील भाविकांनी अथवा ग्रामस्थांनी मंदिरात प्रवेश मिळणेकामी आग्रह धरू नये.

३. श्री भगवती मंदिरात रोप वे अथवा पायी मार्गे मास्क शिवाय प्रवेश नसेल, कृपया सर्वांनी मास्कचा वापर आग्रहाने करावा.

४. श्री भगवती मंदिर व परिसरात आवश्यकतेनुसार सामाजिक अंतर संबंधित जागांची चिन्हांकित केलेली ठिकाणाचा परिपूर्ण वापर करून सामाजिक अंतर पाळावे जेणे करून गर्दीची परिस्थिती उद्भवणार नाही.

५. आवश्यकतेनुसार सॅनिटायझर व साबणाचा वापर करावा.

तरी वरील बाबींची परिपूर्ण पूर्तता आपल्या स्तरावरून पूर्ण करून श्री भगवतीच्या कृपाशीर्वाद घ्यावेत. तसेच श्री भगवती मंदिर व्यवस्थापन व स्थानिक ग्रामपालिका समिती योग्य ते सहकार्य देवू करावे.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.