कोरोना बाधितांचा वाढत असलेल्या आकड्याने सरकारची चिंता वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लसीकरणाला गती देण्याची भूमिका स्वीकारत वय वर्षे १५ ते १८ वयोगटाचे लसीकरण मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याच अनुषंगाने मनमाड शहरात या लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात पहिला डोस दिला जाणार असून त्यासाठी लागणारी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असून लसीकरणावेळी आवश्यक ती दक्षता घेतली जाणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष जगताप यांनी दिली.
नांदगाव शहरात चातुर्मास निमित्त प.पू. महाश्वेतादेवी म. साहब यांचे आगमन
जैन धर्मीय चातुर्मास निमित्त आज आचार्य सम्राट 1008 आनंद ऋषीजी महाराज यांच्या सुशिष्या परमविदूषी...










