आमदार कांदे यांच्या आमदार निधीतून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या नूतनीकरणाला २० लाख मंजूर नांदगाव शहरातील शिवस्फुर्ती मैदान येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या नूतनीकरणासाठी शिवभक्त, शिवकन्या सौ संगीताताई सोनवणे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करत स्मारकाचे काम तातडीने करण्याची मागणी केली होती व आजपासून त्यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात होणार होती तसेच या प्रश्नावर आखिल भारतीय मराठा महासंघाने रास्तारोको आंदोलनाचा इशारा दिला होता. याची त्वरित दखल आमदार सुहास कांदे यांनी युद्धपातळीवर स्मारकासाठी आमदार निधी २० लक्ष रुपये मंजूर करून तत्काळ काम सुरू करण्याचे आदेश दिले. दिनांक १९ फेब्रुवारी अगोदर काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली.या नूतनीकरणाच्या कामाचे उद्घाटन आज आमदार सुहास कांदे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; पहिल्याच दिवशी दोन्ही मतदारसंघात एकूण तीन अर्ज दाखल
नाशिक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता नाशिक जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या...







