loader image
[ays_poll id=7]

शासकीय नियमावलीचे पालन करून यंदाच्या वर्षीच्या विवेकानंद व्याख्यान मालेचे आयोजन…. अध्यक्ष-योगेश म्हस्के

Jan 5, 2022


संस्कृती संवर्धन समिती आयोजित रौप्य महोत्सवी वर्ष यशस्वीपणे पूर्ण करणारी महाराष्ट्रातील एक प्रमुख असणाऱ्या विवेकानंद व्याख्यानमालेचे यंदाच्या वर्षी सर्व शासकीय नियमांचे पालन करून आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षी 10 , 11 आणि 12 जानेवारी दरम्यान महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्यातांना आमंत्रित करून स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सीतालक्ष्मी हॉल , छत्रे हायस्कुल येथे व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात येत असते , यंदाच्या वर्षी देखील महाराष्ट्रातील नामवंत वक्त्यांची पर्वणी ही शहरातील नागरिकांना अनुभवता येणार आहे. दि.10 जानेवारी रोजी व्याख्यान मालेचे उद्घाटन होणार असुन या दिवशी प्रसिद्ध वक्ते श्री विवेक घळसासी , नागपुर (विषय -लस घेऊया सकारात्मकतेची) , दि.11 जानेवारी प्रा.डॉ.सौ.स्मिता देशमुख , अमरावती (विषय-राजमाता जिजाऊ माँसाहेब) , दि.12 जानेवारी अभिनेते श्री राहुल सोलापुरकर , पुणे (विषय-स्वातंत्र्य संग्रामातील काही आज्ञत कथा) यांचे दररोज सायंकाळी 5.30 ते 8.30 पर्यंत , सीतालक्ष्मी हॉल , छत्रे हायस्कुल येथे व्याख्यान आयोजित केले आहे. यंदाच्या वर्षी देखील व्याख्यान मालेवर कोरोना परिस्थितीचे संकट असुन त्या नुसार शासनाने ठरवुन दिलेल्या नियमावली प्रमाणे व्याखान मालेची समितीच्या वतीने तयारी करण्यात आली असुन सामाजिक अंतराचे भान ठेऊन आणि संपूर्ण लसीकरण झालेल्या श्रोत्यांना व्याख्यान मालेला मर्यादीत संख्येनेच प्रत्यक्ष स्वरूपात हॉल मध्ये बसवण्यात येणार आहे. मास्क , सॅनिटायझरची व्यवस्था हॉलच्या ठिकाणी करण्यात येणार आहे.विवेकानंद व्याख्यानमाला ही अत्यंत लोकप्रिय असल्याने मोठ्या प्रमाणात श्रोतावर्ग हा व्याख्यानमालेतील वक्त्यांना ऐकण्यासाठी येत असतो , अशा तमाम श्रोत्यांसाठी समितीतर्फे यंदाच्या वर्षीच्या तीनही वक्त्यांच्या व्याखानाचे युट्युब आणि फेसबुक या सोशल मीडिया साईटवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

समितीच्या वतीने दरवर्षी समाजामध्ये आदर्श ,दिशादर्शक काम करणाऱ्या व्यक्तीसाठी स्वामी विवेकानंद युवा गौरव पुरस्कार देण्यात येत असतो , यंदाच्या वर्षी देखील हा पुरस्कार देण्यात येणार असुन या वर्षीचा पुरस्कार हा मनमाड येथील श्री अनंता प्रभाकर कुलकर्णी यांना देण्यात येणार आहे , श्री कुलकर्णी यांनी भावाचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या भावाला स्वतःची किडनी देऊन जीवनदान दिले आहे.त्यांचा या महान कार्यासाठी त्यांना यंदाच्या वर्षीच्या ‘विवेकानंद युवा गौरव पुरस्कार’ देण्यात येणार आहे.

यंदाच्या वर्षी समितीच्या विशेष असा ‘आधुनिक सावित्री पुरस्कार ‘ देण्यात येणार आहे. कोरोना काळामध्ये अनेक घरांवर वाईट परिस्थिती आली होती , या परिस्थिती अनेकांची इच्छा असून देखील कोणीही मदतीला जाऊ शतक नव्हते अशा काळामध्ये आपल्या पतीच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी अनेक पत्नीनेच आपल्या जीवाची पर्वा नकरता पतीचे प्राण वाचवले , आपल्या जीवाची पर्वा न करता ज्या प्रमाणे सत्यवानाचे प्राण सावित्रीने वाचवले तसे सौ दीपाली सतीश न्हायदे यांनी आपल्या पतीचे प्राण वाचवले यासाठी त्यांना यावर्षी ‘आधुनिक सावित्री पुरस्कार’ देण्यात येणार आहे.

श्री.विवेक घळसासी

प्रा.डॉ.सौ स्मिता देशमुख

राहुल सोलापूरकर

अनंता कुलकर्णी

सौ.दिपाली सतीश न्हायदे


अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
.