Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

गिरणानगर वासियांचा न.पा. हद्दीत समवेशास हिरवा कंदील – ठराव सर्वानुमते मंजूर !

Jan 6, 2022

नांदगाव शहराचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानुसार शहराला लागुन असलेल्या सहा ग्रामपंचायतीच्या विलीनीकरणाबाबत हालचाली सुरू असतांना बुधवारी गिरणानगर ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेण्यात आली.

यावेळी नगर पालिकेत विलीनीकरणाचा ठराव सर्वांनुमते मंजूर करण्यात आला. ग्रामपंचायतीचा सर्वार्थाने विकास होण्यासाठी विलीनीकरण होणे आवश्यक आहे, अशी भूमिका आ. सुहास कांदे यांनी व्यक्त केली होती, त्यादृष्टीने ग्रामपंचायतींना पत्र पाठवत नांदगाव नगरपालीकेत विलीनीकरण करावे, असा ठराव मंजुर करावा असे आवाहन करण्यात आले होते, त्या आवाहनाला प्रतिसाद देत बुधवारी गिरणानगर ग्रामपंचायतीचे प्रशासक, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी विजयकुमार ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयाच्या मैदानात ग्रामसभा घेण्यात आली.

सभेच्या सुरुवातीला जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

ग्रामविस्तार अधिकारी गुंजाळ यांनी आमदार सुहास कांदे यांच्या पत्राचे वाचन केले व गिरणानगर ग्रामपंचायत नगरपालीकेत समाविष्ठ करण्याबाबतचा ठराव मांडला. सुनिल तुकाराम सोनवणे यांनी नगरपालीकेत ग्रामपंचायत गेल्यास गिरणानगर हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकले जाईल म्हणून नगरपालीकेत जाण्यास विरोध दर्शविला तर अँड. उमेश अंबादास सरोदे, सचिन त्र्यंबकराव आहेर, रविंद्र हिरामण बोराळे, प्रवीण सोमासे आदी नागरिकांनी ग्रामसभेत मत मांडले. त्या नुसार परिसरातील रस्ते, पाणी, गटारी, लाईट व इतर भौतिक सुविधा आणि सर्वांगीण विकास होण्यासाठी गिरणानगर ग्रामपंचायत नांदगाव नगरपालीकेत समाविष्ट होण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. या विषयावर चर्चा झाल्यानंतर उपस्थित ३३२ पैकी ३३० विरुध्द २ या बहुमताने हा ठराव मंजूर करण्यात आल्याने गिरणानगर ग्रामपंचायतीला नांदगाव नगरपालीकेत समाविष्ट होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अजून बातम्या वाचा..

आमदार कांदे यांच्या हस्ते विवेकानंद व्याख्यानमालेचे उद्घाटन ! सकारात्मक विचार हाच जीवनाचा खरा “मंत्र” – घळसासी

मनमाड : गेल्या 25 वर्षांपासून मनमाड शहरातील नागरिक आणि रसिक श्रोत्यांना ज्ञानाची शिदोरी देणाऱ्या...

read more
स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेस आज पासुन प्रारंभ….प्रथम पुष्प : श्री विवेक घळसासी

स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेस आज पासुन प्रारंभ….
प्रथम पुष्प : श्री विवेक घळसासी

मनमाड : संस्कृती संवर्धन समिती आयोजित रौप्य महोत्सवी वर्ष यशस्वीपणे पूर्ण करणारी महाराष्ट्रातील एक...

read more

शिवसंस्कार बहुउद्देशिय संस्थेद्वारे दर्पणपत्र दिनानिमित्त केला पत्रकारांचा सन्मान

नांदगाव येथील सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण संवर्धन करण्यासाठी सतत क्रियाशील असणारी संस्था म्हणजे...

read more

नांदगाव तालुक्यात पत्रकारांची भक्कम एकजूट विधायक उपक्रम राबविणार; पत्रकार दिनी निर्धार

नांदगाव तालुक्यात पत्रकार संघाची भक्कम एकजुट तयार करण्याचा निर्धार व्यक्त करत पत्रकारांपुढील बदलती...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]