loader image
[ays_poll id=7]

सोमवार पासून पहिली ते नववीच्या शाळा बंद: छगन भुजबळ

Jan 6, 2022


कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता येत्या सोमवार पासून पहिली ते नववीच्या शाळा ३१ जानेवारी पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या शाळा आता ऑनलाईन सुरु होणार आहेत.परंतु १० वी ते १२ वी चे वर्ग मात्र नियमित सुरु राहणार आहेत.अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकी नंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले सर्व सरकारी, निम सरकारी कार्यालय हॉटेल मॉल सह बाजारपेठेत आता नो व्हॅक्सीन नो एंट्री चा नियम कठोर करण्यात आला आहे. ज्यांचा दुसरा डोस बाकी असेल त्यांनी तो तातडीने घ्यावा. नागरीकांना जर व्हॅक्सीन घेतले नसेल यापुढे नो व्हॅक्सीन नो रेशन असा कटू निर्णय घ्यावा लागेल त्यामुळे नागरीकांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे असे आवाहनही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
प्रशासन अनेक दिवसापासून नागरीक आणि बाजार पेठेतील व्यापाऱ्यांनी नियम पाळण्याचे आवाहन करत आहे. परंतु बाजारपेठेत अजूनही मोठ्याप्रमाणावर गर्दी दिसत आहे.नागरीकांनी नियमांचे पालन न केल्यास काही दिवसानंतर बाजारपेठा हि बंद करण्याची वेळ आणू नका असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला.


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.