कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीत देखील २४ तास सेवा देणाऱ्या मुंबई पोलिस दलासाठी गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. खाजगी कंपनी सारखे आता पोलिसांनी देखील ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांना करोनाची लागण होत असल्याने आता ५५ वर्षांवरील पोलिसांना ‘वर्क फ्रॉम होम’चा आदेश देण्यात आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
सेंद्रीय उत्पादनात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर : ना.भुसे
सेंद्रिय शेतीची वाटचाल आश्वासक असून देशात सेंद्रिय उत्पादनात राज्याचा दुसरा क्रमांक आहे, अशी...










