Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

“ठिणगी” ची “लक्षपूर्ती” !!

Jan 8, 2022

“ठिणगी” ने पार केला लाखाचा टप्पा! वाचक, हितचिंतकांचे मन:पूर्वक आभार स्वर्गीय प्रकाश गोयल यांनी ६ जानेवारी १९८९ रोजी मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधत साप्ताहिक मनमाड ठिणगीचा प्रथमांकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले होते.मनमाड शहरातील वाचकांनी, जाहिरातदारानी तथा हितचिंतकांनी पाठबळ देऊ केले होते. तद्नंतर १९९४ साली साप्ताहिक मनमाड ठिणगीची मुंबई येथील सराफ सुवर्णकार महामंडळ या संघटनेच्या मुखपत्र पदाची धुरा सोपविण्यात आली.अल्पावधीतच संपूर्ण राज्यभरातील सराफ पेठेंमध्ये मनमाड ठिणगीचा अंक पोस्टाद्वारे पोहचत होता व सराफ सुवर्णकार व्यावसायिकांच्या विविध अडचणींना वाचा फोडण्याचे व त्या अडचणी शासन दरबारी पोहचविण्याचे कार्य साप्ताहिक ठिणगीने त्या काळात केले होते. विविध क्षेत्रात झालेल्या “डिजिटल” क्रांतीचा प्रभाव प्रिंट मीडिया वर ही झाला आहे आणि ह्या समयानुरुप बदलाचे आव्हान स्वीकारत १० सप्टेबर २०२१ गणेश चतुर्थी च्या शुभमुहूर्तावर “ठिणगी” डिजिटल स्वरूपात वाचकांपर्यंत पोहचण्यास सुरुवात झाली.आपल्या चोखंदळ वाचकांसाठी, हितचिंतक यांना हक्काचे व्यासपीठ यानिमित्ताने उपलब्ध करून दिले. मनमाड शहरासह नांदगाव,येवला,चांदवड, लासलगाव या शहरातील घडामोडींसह ग्रामीण भागातील घडामोडींना योग्य न्याय देत बातम्यांना प्रसिध्दी देवून मिनिटात वाचकांपर्यंत पोहचविण्यास या माध्यमातून सुरू केले. ६ जानेवारी २०२२ साप्ताहिक ठिणगीच्या वर्धापन दिन आणि मराठी पत्रकार दिनी डिजिटल ठिणगी ने १ लाखाचा टप्पा पार करत वाचक आणि हितचिंतक यांचा विश्वास अधिकच ध्रूढ केलेला आहे. मनमाड, नांदगाव,येवला, चांदवड आणि लासलगाव तथा ग्रामीण भागातील आमचे पत्रकार सहकारी यांचेही यात योगदान आहेच. पुनश्च एकदा सर्वांचे मन:पूर्वक आभार आणि सर्वांना शुभेच्छा !! तुषार प्रकाश गोयल

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]