Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

इंदौर-पुणे महामर्गावर ऊसाने भरलेला ट्रक पलटी

Jan 11, 2022

शहरातुन जाणाऱ्या इंदौर पुणे महामर्गावर अलंकार थिएटर समोर खड्डे चुकविन्याच्या नादात ऊसाने भरलेला ट्रक पलटी झाला. ट्रक पलटी झाल्यामुळे दोन तास वाहतूक कोंडी निर्माण झाली होती दुसऱ्या ट्रकमध्ये ऊस भरल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली

या अपघातात सुदैवाने कुठली ही जीवितहानी झाली नाही. मात्र रस्त्याच्या मधोमध सदरचा ट्रक पलटी झाल्याने सुमारे दोन तासाहुन अधिक वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. महामार्गावर खड्याने रस्त्याची चाळन झाली असल्याने वाहनधारकासह नागरिकांना जीव मुठित धरून प्रवास करावा लागतो तर अपघातांचे मोठे प्रमाण वाढले असून वाहनांचे नुकसान होत आहे. त्यामुळे प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. आज सकाळी मनमाडकडून कोपरगावकडे उसाने भरून जाणारा ट्रक खड्डा चुकवितांना रस्त्याच्या मधोमध पलटी झाला. त्यामुळे काही काळ वाहतुक जाम झाली होती. सुमारे दोन तासानंतर दुसऱ्या ट्रकमध्ये ऊस भरल्यानंतर वाहतुक सुरळीत झाली. रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे आतापर्यंत अनेक अपघात होऊन अपघातामध्ये प्राण देखील गमावले आहेत. गेल्या दोन महिन्यात खड्डे चुकवण्या प्रयत्नात ट्रक पलटी होण्याची चौथी घटना आहे.

अजून बातम्या वाचा..

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]