Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

डॉ. नरेश गिते महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) पदी रुजू

Jan 13, 2022

महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) म्हणून डॉ. नरेश गिते यांनी गुरुवारी (दि. १३) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते महावितरणमध्ये औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून सेवानिवृत्त झाले होते.

राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये ३८ वर्षांचा प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ. नरेश गिते यांनी १९८३ मध्ये जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेला प्रारंभ केला. त्यानंतर सन २००९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवामध्ये (आयएएस) डॉ. गिते यांची निवड झाली. त्यानंतर नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त, राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव, महानंद डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक आदी पदांवर डॉ. गिते यांनी काम केले आहे.

तसेच महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून डॉ. नरेश गिते यांनी सुमारे नऊ महिन्यांच्या कालावधीत प्रामुख्याने ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठा तसेच थेट गावात जाऊन वीजप्रश्न सोडविण्यावर भर दिला. राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२०च्या अंमलबजावणीची विशेष जबाबदारी महावितरणच्या व्यवस्थापनाकडून डॉ. गिते यांच्याकडे देण्यात आली होती. यामध्ये ४५ दिवसांच्या ‘कृषी ऊर्जा पर्वा’च्या माध्यमातून ही योजना गावोगावी पोहोचविण्यात त्यांनी योगदान दिले. गेल्या वर्षी मे महिन्यात ते सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर महावितरणच्या संचालक (मानव संसाधन) पदी थेट भरती प्रक्रियेतून डॉ. गिते यांची नुकतीच निवड झाली.

राज्यातील 2 कोटी ८० लाख वीजग्राहकांना सेवा देणाऱ्या महावितरणचे अंतर्गत मानव संसाधनाचे प्रशासकीय कामकाज आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणखी वेगवान तसेच तत्पर व सकारात्मक करण्यास प्राधान्य देण्यात येईल असे डॉ. नरेश गिते यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

हेराक्लिओन ग्रीस येथील जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी तृप्ती पाराशर हिची निवड

हेराक्लिओन ग्रीस येथील जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी तृप्ती पाराशर हिची निवड

हेराक्लिओन ग्रीस येथे होणाऱ्या जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी भारतीय ज्युनिअर मुलींच्या...

read more
आ. मिटकरी यांनी माफी न मागितल्यास जिल्ह्यात फिरकू देणार नाही : ब्राम्हण समाजाचा इशारा

आ. मिटकरी यांनी माफी न मागितल्यास जिल्ह्यात फिरकू देणार नाही : ब्राम्हण समाजाचा इशारा

आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाची टिंगल करत खिल्ली उडविल्याचा निषेधार्थ येथील संतप्त...

read more
रेल्वेच्या इंधन टँकरमधून डिझेल-पेट्रोलची चोरी उघड;  कर्मचाऱ्यासह त्याच्या पुतण्याला अटक

रेल्वेच्या इंधन टँकरमधून डिझेल-पेट्रोलची चोरी उघड; कर्मचाऱ्यासह त्याच्या पुतण्याला अटक

मनमाड : येथून जवळ असलेल्या पानेवाडी इंधन कंपनीच्या भागात रेल्वेच्या इंधन टँकरमधून डिझेल -...

read more
राष्ट्रसंत सुधारकांच्या जैव-विचार नात्यांची वीण गुंफत रंगला आंबेडकरी शाहिरी जलसा

राष्ट्रसंत सुधारकांच्या जैव-विचार नात्यांची वीण गुंफत रंगला आंबेडकरी शाहिरी जलसा

विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीच्या निमित्ताने भीमनगर चिचोंडी बु...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]