Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

डॉ. नरेश गिते महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) पदी रुजू

Jan 13, 2022

महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) म्हणून डॉ. नरेश गिते यांनी गुरुवारी (दि. १३) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते महावितरणमध्ये औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून सेवानिवृत्त झाले होते.

राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये ३८ वर्षांचा प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ. नरेश गिते यांनी १९८३ मध्ये जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेला प्रारंभ केला. त्यानंतर सन २००९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवामध्ये (आयएएस) डॉ. गिते यांची निवड झाली. त्यानंतर नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त, राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव, महानंद डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक आदी पदांवर डॉ. गिते यांनी काम केले आहे.

तसेच महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून डॉ. नरेश गिते यांनी सुमारे नऊ महिन्यांच्या कालावधीत प्रामुख्याने ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठा तसेच थेट गावात जाऊन वीजप्रश्न सोडविण्यावर भर दिला. राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२०च्या अंमलबजावणीची विशेष जबाबदारी महावितरणच्या व्यवस्थापनाकडून डॉ. गिते यांच्याकडे देण्यात आली होती. यामध्ये ४५ दिवसांच्या ‘कृषी ऊर्जा पर्वा’च्या माध्यमातून ही योजना गावोगावी पोहोचविण्यात त्यांनी योगदान दिले. गेल्या वर्षी मे महिन्यात ते सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर महावितरणच्या संचालक (मानव संसाधन) पदी थेट भरती प्रक्रियेतून डॉ. गिते यांची नुकतीच निवड झाली.

राज्यातील 2 कोटी ८० लाख वीजग्राहकांना सेवा देणाऱ्या महावितरणचे अंतर्गत मानव संसाधनाचे प्रशासकीय कामकाज आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणखी वेगवान तसेच तत्पर व सकारात्मक करण्यास प्राधान्य देण्यात येईल असे डॉ. नरेश गिते यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

आमदार कांदे यांच्या पाठपुराव्याला यश – तालुक्यात सहा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती

आमदार कांदे यांच्या पाठपुराव्याला यश – तालुक्यात सहा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे नांदगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून करीत...

read more
नवनियुक्त मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल साहेब यांचे मनमाड शहराच्या वतीने सत्कार व स्वागत

नवनियुक्त मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल साहेब यांचे मनमाड शहराच्या वतीने सत्कार व स्वागत

नवनियुक्त मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल यांचे मनमाड शहराच्या वतीने सत्कार व स्वागत उप नगराध्यक्ष...

read more
नवनियुक्त मुख्याधिकारी डॉ. सचिन कुमार पटेल यांचे सिटू संघटनेतर्फे स्वागत आणि सत्कार!

नवनियुक्त मुख्याधिकारी डॉ. सचिन कुमार पटेल यांचे सिटू संघटनेतर्फे स्वागत आणि सत्कार!

मनमाड नगर परिषदेचे नुतन मुख्याधिकारी डॉ सचिन कुमार पटेल यांनी पालिकेचे पदभार स्विकारल्याबद्दल...

read more
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्या विरोधात मनमाड शहर काँग्रेसकडून मांफी मागो आंदोलन .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्या विरोधात मनमाड शहर काँग्रेसकडून मांफी मागो आंदोलन .

   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्या विरोधात मनमाड शहर काँग्रेसकडून काल मांफी मागो आंदोलन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]