” शिवसेना आपल्या दारी ” या अभियानांतर्गत जनतेच्या भेटी घेताना निदर्शनास आलेल्या प्रश्नांना तडीस नेत २६ गाव पाणीपुरवठा योजना पुनरुज्जीवनासाठी आमदार सुहास कांदे यांनी मुखयमंत्र्यांकडे तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत दहिवाळसह २६ गाव नळ पाणीपुरवठा योजनेस २२ कोटी ९० लाख निधी मंजूर करून घेतला. याकामी कृषी मंत्री दादाजी भुसे यांनीही सहकार्य केले.
जितेंद्र वाले यांचा सत्कार
रोटरी क्लब तर्फे आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित झालेले विज्ञान विषयाचे शिक्षक श्री. जितेंद्र श्रावण...









