Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

Jan 14, 2022

येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील महाविद्यालयात प्राचार्य डॉ.ए.व्ही पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले .
प्रारंभी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.पी.जी.आंबेकर यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील राजमाता जिजाऊंचे आणि भारतीय संस्कृतीचे जगाला परिचय करून देणार्‍या स्वामी विवेकानंदांचे योगदान याविषयीची माहिती देऊन उत्सव व जयंती का साजरी करायची त्यामागचा दृष्टिकोन काय आहे यासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या श्रीमती ज्योती पालवे वरिष्ठ पर्यवेक्षक डॉ.सतीश तांबे कनिष्ठ पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल फंड,प्राध्यापक वृंद, कार्यालयीन कुलसचिव समाधान केदारे , कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने करण्यात आले होते . कार्यक्रमाप्रसंगी कोरोना नियमांचे पालन करण्यात आले

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – सत्यजीत तांबेंनी घेतली आमदारकीची शपथ, समर्थकांची एकच वादा…… सत्यजित दादा अशा जोरदार घोषणा

बघा व्हिडिओ – सत्यजीत तांबेंनी घेतली आमदारकीची शपथ, समर्थकांची एकच वादा…… सत्यजित दादा अशा जोरदार घोषणा

नाशिक पदवीधर मतदार संघातून निवडून आलेले सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली...

read more
संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 09/02/2023 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 09/02/2023 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]