Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

महावितरणच्या गलथान कारभाराचा कळस, मुख्य बाजारपेठेतच तब्बल आठ तास वीज गायब!

Jan 20, 2022

शहरातील वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला असून आज दुपार पासून ते रात्रीपर्यंत बत्तीगुल असल्याने अनेकांना अंधाराचा सामना करावा लागला. खंडित वीजपुरवठा कधी सुरू होईल याबाबत अधिकारी सांगायला तयार नाही त्यामुळे शहरातील व्यापार, व्यवसायासह घरगुती कामही ठप्प झाले होते

शहरातील वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे बुधवारी (ता १९) मनमाडकर अक्षरशः हैराण झाले दुपारी तीन वाजेपासून रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेसह शहरातील अर्धा भाग २ यातील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. दुपारी गेलेली वीज सायंकाळी येईल या आशेने नागरिक वाट पाहत असतांनाच रात्री देखील वीज पुरवठा सुरळीत झाला नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला तर सायंकाळी खरेदीच्या वेळेला बाजारपेठेमध्ये अंधाराचे साम्राज्य असल्याने व्यापारी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. वीज पुरवठा इतका वेळ का खंडित झाला याबाबतची कोणतीही माहिती महावितरणने अधिकृतपणे दिली नाही. अनेकांनी फोन करूनही वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी फोनही उचलले नाही. त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.  शहरातील भाग दोन मध्ये बुधवारी दुपारी तीन वाजेपासून संपूर्ण शहराच्या निम्म्या भागाचा वीज पुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक खंडित झाला दर वेळी वीज जाते आणि काही वेळाने येते अशी अपेक्षा असतांना रात्री आठ वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत झाला नाही त्यामुळे सायंकाळी सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरून नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली मुख्य म्हणजे भाग दोनमध्ये व्यापारी व्यावसायिक, बाजारपेठ दुकाने भाजीमार्केट शिवाय निवासी भाग असा इतका मोठा भाग असतानाही हा संपूर्ण भाग अंधारात बुडाला त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली वीज पुरवठा खंडित झाला याबाबत महावितरण अधिकार्‍यांना विचारणा केली असता अधिकारी फोन उचलत नाहीत आणि कोणती माहिती ग्राहकांना देत नाही त्यामुळे नागरिकांचा संताप आता अधिकच भर पडली आहे शहराचा वीजपुरवठा तासंतास खंडित होत असल्याचा प्रकार गेल्या काही दिवसापासून वाढला आहे

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
बघा व्हिडिओ : वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाने घेतली नोंद -नांदगावच्या योग शिक्षकाची बर्फाच्या लादीवर ५१ योगासने आणि २१ सूर्यनमस्कार

बघा व्हिडिओ : वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाने घेतली नोंद -नांदगावच्या योग शिक्षकाची बर्फाच्या लादीवर ५१ योगासने आणि २१ सूर्यनमस्कार

नांदगाव - मारुती जगधने येथील योग प्रशिक्षक बाळू मोकळ यांनी चक्क बर्फाच्या थंड लादीवर ५१ योगासने व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]