Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

के आर टी शाळेच्या बाल वैज्ञानिकाची राष्ट्रीय पातळीवर निवड

Jan 21, 2022

येथील केआरटी शाळेच्या बाल वैज्ञानिकाची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली.राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद आयोजित स्पर्धेसाठी कवी रविंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडियम शाळेच्या मोठ्या गटातून हर्षल देविदास चौधरी याने रोबोट तयार केला.लहान गटातून श्रावणी अमर चव्हाण हिने पिझों इलेक्ट्रिक जनरेशन हा प्रकल्प तयार केला . तसेच आयर्न नंदकिशोर पगार या बाल वैज्ञानिक विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली . त्याने सोलर एनर्जीवर चालणारा पोर्टेबल फॅन हा प्रकल्प तयार केला.पोर्टेबल फॅनचा उपयोग – सोलर पॅनलचा वापर करून सौर ऊर्जेवर चालणारा पोर्टेबल फॅन आकाराने छोटा असल्याने तो हाताळण्यासाठी सोपा असून गरजेनुसार कोठेही ठेवता येतो. हा पंखा सौर ऊर्जेवर चालणारा असल्याने विद्युत ऊर्जेची बचत होते.हा पंखा कोणत्याही प्रकारचे हवा प्रदुषण , जलप्रदुषण ध्वनी प्रदुषण करीत नाही. हा पंखा कारमध्ये देखील वापरू शकतो.कारण काही जणांना कारमध्ये एसीची हवा सहन होत नाही.अशा वेळी कारच्या बाहेर सोलर पॅनल बसवून सोलर पंखा आपण कारमध्ये बसू शकतो . स्वयंपाक घरात गृहिणी गरजेनूसार हा पंखा वापरू शकतात. शिक्षक प्रविण आहेर , शिक्षिका सौ.संगिता कदम व आर्यनचे वडिल नंदकिशोर पगार यांचे मार्गदर्शन लाभले.नांदगाव तालुक्यातून राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत स्पर्धेत भाग घेणारी केआरटी एकमेव शाळा होती . प्राचार्य मुकेश मिसर , मुख्याध्यापक दिपक व्यवहारे , उपप्राचार्य वैभव कुलकर्णी , विश्वस्त धनंजय निंभोरकर , शिक्षक , शिक्षकेत्तर , कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]