loader image
[ays_poll id=7]

लासलगांव स्टेशनवरील किसानसेवा रेल्वेच्या पार्सल व्हॅन (व्हीपी) ची संख्या वाढवा – ना.डॉ.भारती पवार

Jan 21, 2022


केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना.डॉ.भारती पवार यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मेमू एक्सप्रेस सुरु केली त्याबद्दल प्रथम उत्तर महाराष्ट्राच्यावतीने आभार मानले. त्यानंतर मध्य रेल्वेच्या लासलगांव स्टेशनवरील किसानसेवा रेल्वेच्या पार्सल व्हॅन (व्हीपी) ची संख्या वाढवून मिळावी यासाठी वेळोवेळी मागणी होत असल्याचे लक्षात घेवून ना.डॉ.भारती पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री.अश्विनी वैष्णव यांचे सोबत चर्चा केली.
कृषि उत्पन्न बाजार समिती, लासलगांव (जि.नाशिक) ही बाजार समिती कांदा, भुसार, तेलबिया, डाळींब, फळे व इतर सर्व प्रकारच्या भाजीपाल्याच्या खरेदी-विक्री व्यवहारासाठी आशिया खंडात नावाजलेली बाजार समिती असुन लासलगांव व परीसरातील शेतकरी बांधव वरील शेतीमालाबरोबर मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे देखील उत्पादन घेतात.
त्यानुसार केंद्र शासनाने नाशिक जिल्ह्यातील वरील प्रमुख शेतीमालाला देशातील बाजारपेठ उपलब्ध व्हावे यासाठी मध्य रेल्वेची किसानसेवा रेल्वे सुरू केली होती . सदर किसानसेवा रेल्वेने लासलगांव व परीसरातील व्यापारी व शेतकरी बांधव यांचा लासलगांव रेल्वे स्टेशनवरून मोठ्या प्रमाणात कांदा, डाळींब, फळे व इतर सर्व प्रकारचा भाजीपाला परराज्यात विक्रीसाठी पाठवित आहे. परंतू मध्य रेल्वेने सदर किसानसेवा रेल्वे गाडीस यापुर्वी लासलगांव स्टेशनवर दोन पार्सल व्हॅन (व्हीपी) उपलब्ध करून दिले होते. मात्र मागील १० दिवसांपासून मध्य रेल्वेने लासलगांव स्टेशनवर सदर किसानसेवा रेल्वे गाडीच्या दोन बॉक्सची (व्हीपी) संख्या कमी करून आजमितीस फक्त एकच पार्सल व्हॅन (व्हीपी) उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे येथील व्यापारी व शेतकरी वर्गास सदर किसानसेवा रेल्वे गाडीने त्यांचा कांदा, डाळींब, फळे व इतर सर्व प्रकारचा भाजीपाला परराज्यात विक्रीसाठी पाठविण्यास अडचण येत आहे. तसेच सध्या लासलगांव व परीसरात शेतकरी बांधवांचा द्राक्षे काढणीचा हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू झाला असून सदरचा द्राक्षे हा शेतीमाल किसानसेवा रेल्वेच्या एका पार्सल व्हॅन (व्हीपी) मध्ये परराज्यात पाठविणेसाठी अपुरा पडत असून त्यामुळे येथील व्यापारी व शेतकरी वर्गास अडचण निर्माण होत आहे.
तरी सर्व वस्तुस्थितीचा सहानुभुतीपुर्वक विचार करून लासलगांव व परीसरातील व्यापारी व शेतकरी बांधवांना शेत पिके व इतर सर्व प्रकारचा भाजीपाला किसानसेवा रेल्वेद्वारे जास्तीत जास्त प्रमाणात इतर राज्यात पाठविता यावा यासाठी मध्य रेल्वेच्या लासलगांव स्टेशनवर सदर किसानसेवा रेल्वेचे तीन ते चार पार्सल व्हॅन (व्हीपी) मिळावे अशी मागणी केली. यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल असेही यावेळी रेल्वे मंत्री यांचेशी बोलताना डॉ.भारती पवार यांनी सांगितले. दरम्यान कोरोना महामारीच्या काळात बंद करण्यात आलेले रेल्वे थांबे पुन्हा सुरु करणेबाबत देखील रेल्वे मंत्री यांचेशी चर्चा करून विनंती करण्यात आली.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
.