Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

जिल्ह्यातील भाजप विजयाच्या ५० % जागा केदा आहेर यांच्या देवळ्यातुनच !

Jan 24, 2022

भाजपा या नगरपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष म्हणून समोर आला ,पूर्वी हा पक्ष म्हणजे शहरी व व्यापाऱ्यांचा पक्ष, अशी ओळख असणा–या भाजपाने नगर परिषदांच्या निवडणुकीत दैदिप्यमान कामगिरी केली असून. जिल्ह्यातील, एकूण 102 जागांपैकी सर्वाधिक 30 जागा जिंकून हा पक्ष जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष ठरला. या कामगिरीने ग्रामीण भागातही भाजपने हातपाय पसरण्यास सुरूवात केल्याचा अर्थ काढला जात आहे. 

मात्र या 30 जागांमध्ये एकट्या भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या 15 जागा आहेत. भाजपाने ज्या काही जागा जिंकल्या, त्यात जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी देवळा नगर परिषदेत 15 जागा जिंकल्या तर जिल्ह्यातील बाकी नेत्यांनी 15 जागा जिंकल्या आहेत. यामुळे एका बाजूला केदा नाना आणि दुसऱ्या बाजूला मंत्री भारती पवार, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यासारखे दिग्गज नेते एका पारड्यात आहेत. जिल्ह्यात भाजपा एक नंबरला आणण्यात केदा आहेरांचा मोठा वाटा असतांना देखील त्यांनी कुठेही श्रेयवादाचे राजकारण केले नाही.

तर दुसऱ्या बाजूला मंत्री भारती पवार या त्यांचे अपयश झाकण्यासाठी सुरगाण्याकडे बोट दाखवत आहेत. त्यांना अजूनही त्यांचा पराभव मान्य नाही हे दुर्दैवीच आहे. त्यांनी मोठ्या मनाने प्रभाव स्वीकारणे गरजेचे असतांना त्या स्थानिक राजकारणात स्वतःला अडकून घेत आहेत हे प्रगल्भ राजकारणाला न शोभणारे आहे. कोण कुठे हारले त्यापेक्षा आपली रॅली होऊनहीं भाजपाच्या जागा घटल्या याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

अजून बातम्या वाचा..

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]