Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात राष्ट्रीय बालिका दिन साजरा

Jan 24, 2022

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात २४ जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.व्ही.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींच्या सुरक्षिततेबाबत संवेदनशीलता आणि जनजागृती करण्यासाठी तसेच मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे मिळावे यासाठी कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. या शिबिरात क्रीडा शिक्षक श्री. डी.पी. त्रिभुवन व त्यांच्या कराटेपटूंची ज्युडो कराटे तायक्वांदो, सिकाई मार्शल आर्ट,किक बॉक्सिंग यासारख्या कराटे प्रकारांचे प्रात्यक्षिक दाखवून, मुलींनी आत्मसंरक्षणासाठी याचा वापर कसा करावा त्यासंदर्भातले मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ पी जी आंबेकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महिला सबलीकरणसाठी असे उपक्रम स्तुत्य असतात असे सांगितले. यावेळी कराटे पटूंचा सत्कार तसेच सेल्फी विथ डॉटर असे उपक्रमही राबवण्यात आले. यावेळी उपप्राचार्या प्रा. ज्योती पालवे, कुलसचिव श्री.समाधान केदारे, पर्यवेक्षक, डॉ सतीश तांबे, प्रा. विठ्ठल फंड, महिला विकास कक्षाच्या कार्यक्रम अधिकारी सौ.कविता काखंडकी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ.दिनेश कराड, प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ पी बी परदेशी तर आभार प्रा. वर्षाराणी पेढेकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना, महिला विकास कक्ष व शारीरिक शिक्षण विभाग यांच्यातर्फे करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]