Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आमदार सुहास कांदे यांची वीज वितरण कंपनीच्या अधिकारी तथा कर्मचारी यांच्या सोबत एकत्रित बैठक संपन्न

Jan 24, 2022

सातत्याने ग्रामीण भागातील वीज वितरण कंपनीच्या कारभाराच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत आमदार सुहास कांदे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी तथा कर्मचारी यांची एकत्रित बैठक नांदगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित केली होती. वीज पुरवठा खंडित करण्याअगोदर ग्राहकाला पूर्वसूचना लेखी स्वरूपात देणे आवश्यक असल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले. वीज ग्राहकांशी समंजसपणे वर्तन करण्या बरोबरच जर पूर्वसूचना न देता वीजपुरवठा बंद केल्यास त्यास शिवसेना स्टाईल ने उत्तर दिले जाईल असेही त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले. अधिकाऱ्यांच्या तसेच कर्मचाऱयांच्या ज्या काही अडचणी असतील त्यासाठी जरूर मदत करू असेही कांदे यांनी सांगितले. कायद्याच्या आधीन राहून शेतकऱ्यांना सहकार्य करावे असे आमदार कांदे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या बैठकीला मनमाड उप विभागीय कार्यकारी अभियंता तडवी, नांदगाव उप विभागीय कार्यकारी अभियंता वाटपाडे, तालुक्यातील सर्व कक्षाचे सहाय्यक अभियंता, तालुक्यातील सर्व वायरमन यांसह शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे,गुलाब भाबड, विष्णू निकम सर, श्रीकांत परदेशी, बाळासाहेब आव्हाड, सुनील जाधव, सागर हिरे उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदुरीहून परतणाऱ्या मनमाड आगाराच्या बस ला अपघात – महिला बस कंडक्टर सह दोहोंचा चा मृत्यू,अनेक प्रवाशी जखमी

नांदुरीहून परतणाऱ्या मनमाड आगाराच्या बस ला अपघात – महिला बस कंडक्टर सह दोहोंचा चा मृत्यू,अनेक प्रवाशी जखमी

मनमाड - मनमाड आगाराच्या नांदुरी मनमाड बसला मतेवाडी ता चांदवड शिवारात भिषण अपघात झाला असून अपघातात...

read more
बघा व्हिडिओ – लासलगाव बाजार समिती मध्ये कांदा अनुदान फॉर्म स्वीकारण्यासाठी विशेष कक्ष

बघा व्हिडिओ – लासलगाव बाजार समिती मध्ये कांदा अनुदान फॉर्म स्वीकारण्यासाठी विशेष कक्ष

आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगांव येथील सदस्य सचिव नरेंद्र वाढवणे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]