मनमाड शहरातील कवी रवींद्रनाथ टागोर स्कूल मधील के.जी. विभाग (नर्सरी, ज्यू.के.जी, सिनी.के जी ) चे वर्ग २७ जानेवारी पासून सुरू होणार असल्याचे शाळे तर्फे निर्देशित करण्यात आले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार मास्क वापरणे बंधनकारक असून एका बेंचवर एक विद्यार्थी बसेल अशी व्यवस्थेसह इतर बाबींची पूर्तता शालेय प्रशासनाने केली आहे. या निर्णयाचे पालकवर्गाने स्वागत केले असून २७ तारखेपासून बालकांना शाळेत पाठवावे असे आवाहन प्रा.मुकेश मीसर,मुख्याध्यापक दीपक व्यवहारे,उपप्राचार्य वैभव कुलकर्णी आणि विश्वस्त धनंजय निंभोरकर यांनी केले आहे.
मनमाड जळगाव स्थानकादरम्यान १४,१५ ऑगस्ट रोजी मेगब्लॉक – अनेक गाड्या रद्द तर काहींच्या मार्गात बदल
मनमाड-जळगाव स्थानकादरम्यान मेगाब्लॉकमुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून या काळात प्रवाशांना...










