मनमाड शहरातील कवी रवींद्रनाथ टागोर स्कूल मधील के.जी. विभाग (नर्सरी, ज्यू.के.जी, सिनी.के जी ) चे वर्ग २७ जानेवारी पासून सुरू होणार असल्याचे शाळे तर्फे निर्देशित करण्यात आले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार मास्क वापरणे बंधनकारक असून एका बेंचवर एक विद्यार्थी बसेल अशी व्यवस्थेसह इतर बाबींची पूर्तता शालेय प्रशासनाने केली आहे. या निर्णयाचे पालकवर्गाने स्वागत केले असून २७ तारखेपासून बालकांना शाळेत पाठवावे असे आवाहन प्रा.मुकेश मीसर,मुख्याध्यापक दीपक व्यवहारे,उपप्राचार्य वैभव कुलकर्णी आणि विश्वस्त धनंजय निंभोरकर यांनी केले आहे.
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद
राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...










