Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा…

Jan 27, 2022


मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी कोरोना चे सर्व शासकीय नियम पाळून व सामाजिक अंतर ठेवून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करून ध्वजारोहण करण्यात आला.याप्रसंगी एनसीसी विभागाचे प्रमुख लेफ्टनंट प्रकाश बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. कोरोना महामारी मुळे जास्त गर्दी होऊ नये म्हणून महाविद्यालयाच्या वतीने युट्युब द्वारे कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कोरोना नव नवीन रूप धारण करत असून महामारी गेली नाही. त्यामुळे सर्वांनी स्वयम शिस्त पाळून व एक जबाबदार नागरिक म्हणून राहिले पाहिजे असा संदेश दिला. कोरोनाच्या कारणास्तव यावेळी होणारे संचलन व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. शासकीय आदेशानुसार कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी.जी आंबेकर, श्रीमती ज्योती पालवे, कुलसचिव श्री समाधान केदारे, वरिष्ठ पर्यवेक्षक डॉ. एस एस तांबे, कनिष्ठ पर्यवेक्षक प्रा. व्ही. आर. फंड, कार्यालयीन अधिक्षक श्री एकनाथ जी आहिरे व 50 टक्के महाविद्यालयीन स्टाफ उपस्थित होते. लाइव्ह प्रक्षेपण द्वारे 327 विद्यार्थी व पालकांनी कार्यक्रमास उपस्थिती नोंदवली. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील परिसरात प्राचार्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनसीसी कार्यक्रमाधिकारी लेफ्टनंट पी.आर बर्डे यांनी केले तर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन एनएसएस अधिकारी डॉ. पी बी. परदेशी यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]