loader image

पूर्णाकृती पुतळे उभारावेत : आर.पी आय. ची मागणी

Jan 29, 2022


 डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांचे शहरात अर्धकृती पुतळे असून सदर ठिकाणी पूर्णाकृती पुतळे बसविण्यात यावे या  मागणीसाठी आज रिपाइंच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे

                 शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,म.गांधी आदी महापुरुषांचे अर्धकृती पुतळे असून सदर ठिकाणी  पूर्णाकृती पुतळे उभारण्यात यावे हि अनेक वर्षापासून असलेली मागणी शासन दरबारी धूळ खात पडली आहे.
पुतळा असून फार जुना झालेला आहे. पाऊस, वारा, प्रदुषण आदी कारणामुळे पुतळ्याची फिनीशिंग खूपच कमी झालेली असून पुतळ्यास काही प्रमाणात क्रॅचेस व तडे पडलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी शेकडो प्रवासी व येणारे जाणारे नागरीक नतमस्तक होत असतात तेव्हा पुतळ्याची झालेली जीर्णावस्था योग्य दिसत नाही.
१४ एप्रिल, ६ डिसेंबर, बुध्द जयंती, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन इत्यादी महत्वाच्या दिवशी याठिकाणी हजारो नागरिक  मानवंदना देत नतमस्तक होत असतात. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा येथे येणाऱ्या प्रत्येक नागरीक व प्रवाशांना स्फुर्तीदेणारा असावा याकरीता सदर पुतळा हा पुर्णाकृती होणे खूपच गरजेचे व आवश्यक आहे. शहराचा सर्वांगीण झालेला विकास पहाता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले या महापुरुषांचे पुर्णाकृती पुतळे होणे ही आज काळाची गरज बनलेली असून त्यामुळे शहराच्या सौंदर्भात भरच पडणार आहे व सर्व मनमाडकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न पूर्ण होणार आहे. नुकतेच मालेगाव शहरामध्ये विश्रामगृह समोरील जागेमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळ्यास मंजूरी देण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर मनमाड शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना मंजुरी देऊन बसविण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)वतीने पालिका कार्यालयाजवळ रिपाइंचे जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र आहिरे, जिल्हा कार्याध्यक्ष गंगादादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले त्वरित निर्णय घेऊन कार्यवाही व्हावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला यावेळी युवक शहराध्यक्ष शेखर आहिरे, सुरेश शिंदे, सुशील खरे, पद्माकर निळे, गुरुकुमार निकाळे, विलास आहिरे, सुरेश जगताप, पप्पू दराडे, बाबा शेख, विशाल छाजेड, संजय मोरे, सुरेंद्र आहिरे, नितीन परदेशी उपस्थित होते


अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
.