loader image
[ays_poll id=7]

चांदवड तंत्रनिकेतन मध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्न !

Jan 31, 2022

एच.एच. जे. बी. तंत्रनिकेतन, चांदवड मध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा अंतर्गत, विद्यार्थ्यांकरिता “कवितेच्या गावा जावे” हा कार्यक्रम 28 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून मनमाड येथील जेष्ठ कवी लेखक व पत्रकार संदीप देशपांडे सर उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना देशपांडे सरांनी वेगवेगळ्या धाटणीच्या कविता ऐकवल्या तसेच मराठी भाषेचा वापर, संवर्धन, त्याचे महत्त्वही पटवून दिले.

कार्यक्रमाचे आयोजन अधिव्याख्याता सौ. मेघना वाघ यांनी केले, तर मनोगत व्यक्त करताना विभाग प्रमुख डी.व्ही. लोहार सरांनी कवितेचे जीवनातील स्थान किती महत्त्वाचे आहे ते सांगितले. अधिव्याख्याता गणेश पगार यांनी आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ.विशाल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा.श्री बेबीलालजी संचेती, विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष दिनेश लोढा, मानद सचिव जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजीत सुराणा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनाचे समन्वयक अरविंद भन्साळी, सह मानद सचिव झुंबरलाल भंडारी व तंत्रनिकेतनाचे मुख्य समन्वयक तथा प्रबंध समिती सदस्य राजेद्र बंब यांनी या आयोजनाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.

अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
.