आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागातर्फे जंगली जनावरांच्या हल्ल्यातील जखमींना सहायता निधी उपलब्ध करुन देण्यात आला. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मार्फत हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी अथवा मृत्यू झालेल्या व्यक्तींना आर्थिक सहाय्य दिले जाते, या अंतर्गत नांदगाव तालुक्यातील मंद्वाद येथील श्रीमती मीनाबाई सुभाष आहेर यांना आमदार सुहास कांदे व वनाधिकारी कासार यांच्या हस्ते तीस हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
मनमाड बाजार समिती – आजची आवक व लिलाव झालेली वाहने
कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड ता. नांदगांव जि.नाशिक गुरुवार दि. 03/11/2022 मका बाजारभाव कमी -...










