loader image
[ays_poll id=7]

अर्थसंकल्प २०२२ – ठळक मुद्दे

Feb 1, 2022

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला – त्यामध्ये देशातील जनतेसाठी कोणत्या महत्त्वाच्या सुविधा आणि योजनांची घोषणा करण्यात आली आहे

 अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय ?

● देशात तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार, तसेच पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण

● जलसिंचन योजनेच्या माध्यमातून 9 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार, त्यासाठी नवीन योजना राबविणार

● 1 कोटी 63 लाख शेतकऱ्यांकडून विक्रमी धान्य खरेदी केली जाणार, 2.37 लाख करोड रुपये MSP Value शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार

● देशात प्रचंड प्रमाणावर तेलबिया आयात केल्या जाणार, तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार

● नैसर्गीक शेतीसाठी झिरो बजेट शेतीला प्रोत्साहन देऊन नियोजन करण्यासाठी योजना राबविणार तसेच नाबार्डच्या माध्यमातून स्टार्टअपना मदत करणार

● ग्रामीण विकासासाठी प्रयत्न करणार, कृषी आधारीत स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देणार, युवकांना मदत करण्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून भांडवल पुरवणार

उद्योगासाठी काय ?

● सौरऊर्जा निर्मितीसाठी 19,500 कोटी रुपयांची तरतूद, देशात सौरऊर्जेसाठी सौर पॅनेल आधारित ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यावर भर

● तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन चार्जिंग स्टेशन्स बसवण्यात येणार, बॅटरी अदलाबदली म्हणजेच बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी लागू करणार

● सरकारकडून संरक्षण क्षेत्रात संशोधनासाठी 25 टक्के बजेटची तरतूद केली जाणार

● पोस्ट ऑफिसमध्ये एटीएम सेवा सुरू होणार

● पुढील आर्थिक वर्षात 25 हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बनवले जाणार

क्रिप्टो करन्सीबाबत मोठा निर्णय

● पुढील वर्षी भारताचे स्वतःचे डिजिटल चलन लॉन्च करण्याची घोषणा केली – हे चलन रिझर्व्ह बँक स्वतः आणणार असून, ते Blockchain तंत्रज्ञानावर आधारित असेल

● त्यामुळे डिजीटल करन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तरुण वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे

● याव्यतिरिक्त क्रिप्टोकरन्सीवरील कमाईवर 30% कर लागणार

 रेल्वे

● 3 वर्षात 400 नवीन वंदे भारत ट्रेन्स उभारणार

● टपाल आणि रेल्वे नेटवर्कच्या एकत्रीकरणात पुढाकार घेतला जाणार; एक स्टेशन, एक उत्पादन ही संकल्पना राबवली जाणार

● ऊर्जा, वाहतूक, विपणन यावर भर दिला जाणार

● यंदाच्या वर्षांपासून देशात ई-पासपोर्ट सेवा सुरू होणार

शेअर मार्केट आणि इतर

● सरकारी टेंडरचे नियम बदलणार, संपूर्ण प्रक्रिया डिजिटल होणार

● कॉर्पोरेट टॅक्स 18% वरून 15% वर, सहकार क्षेत्राला मोठा दिलासा

● एलआयसीचा आयपीओ लवकरच बाजारात आणणार

● सलग सहाव्या वर्षी आयकारात कोणताही बदल नाही, आयटीआर मधील विसंगती सुधारण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी दिला जाणार

 दरम्यान हा अर्थसंकल्प 2047 पर्यंतचा ब्लूप्रिंट असणार – अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.