Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात कर्करोग दिन कार्यक्रम संपन्न

Feb 4, 2022

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे राष्ट्रीय सेवा योजना व उपजिल्हा रुग्णालय मनमाड यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेत व मार्गदर्शनाखाली कर्करोग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांनी आपल्या मनोगतातून सध्याचे युग हे नॅनोटेक्नॉलॉजी चे युगआहे या युगात मानवाने सर्वच क्षेत्रात प्रगती केलेली आहे.या वैज्ञानिक प्रगतीच्या जोरावर बऱ्याचशा आजाराचे निदान केलेले आहे आणि त्या आजारावर यशस्वीपणे उपचार केले आहे.परंतु अजूनही कॅन्सर सारख्या आजारावर मानवाला फारशी प्रगती करता आली नाही.असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.कविता कातकडे उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मनोगतातून कॅन्सर या आजाराची कारणे सांगितली यामध्ये धूम्रपान, पर्यावरण प्रदूषण, अल्ट्रावायलेट किरण, डायट,तसेच हवेतील व्हायरस इत्यादी कारणांमुळे कॅन्सर हा आजार होतो. तसेच स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आहे या आजाराचे लवकर निदान होण्यासाठी सेल्फ एक्झामिनेशन महत्त्वाचे असते.इत्यादी विचार त्यांनी मांडले. सदर कार्यक्रमासाठी श्रीमती मोहिनी डोंगरे (समुपदेशक)श्रीमती सुनिता गांगुर्डे (परिचारिका) कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ.ज्योती पालवे उपस्थित होत्या.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे आयोजन करताना करोना नियमांचे पालन करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]