Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

चुका दुरुस्त करून गिर्यारोहण अविरत सुरू रहावे : महेश भालेराव

Feb 7, 2022

मनमाड शहराची ओळख असलेल्या अंगठ्याच्या डोंगरावर गिर्यारोहक अनिल वाघ आणि मयूर म्हस्के यांचे पडून मृत्यू झाल्याच्या अपघाताची घडलेली घटना अत्यंत दुदैवी आहे अपघाताच्या घटना या दुर्दैवी असतात मात्र त्यात खचून न जाता ट्रेक करणे सोडायचे नसते तर ज्या चुका, अडचणी उदभवल्या त्या दुरुस्त करून पुन्हा सुरवात करायची असते आणि हीच खरी श्रद्धांजली आपल्या अनिल आणि मयूर या गिर्यारोहक मित्रांना ठरेल असे मत शोकसभेत व्यक्त करण्यात आले

गेल्या चार दिवसांपूर्वी (ता २) बुधवार रोजी
नगर येथील इंद्रप्रस्थ टेकर्स ग्रुपचे प्रशिक्षित टेकर्स अनिल वाघ, मयूर म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हडबीची शेंडीवर १२ सदस्यांच्या टीमने चढाई केली.
मात्र उतरत असतांना यातील टेकर्स अनिल वाघ, मयूर म्हस्के यांचा अपघाती मृत्यू झाला या घटनेने मनमाड शहरासह राज्यभर टेकर्स हळहळले या दोन गिर्यारोहकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मनमाड बचाव कृती समिती, मनमाड जनहित विकास संस्था यांच्यावतीने महात्मा फुले वाचनालयात शोकसभेचे  आयोजन करण्यात आले गिर्यारोह प्रवीण व्यवहारे, जेष्ठ पत्रकार नरेश गुजराथी, जनहित समितीचे अध्यक्ष अशोक परदेशी, बचाव कृती समितीचे पुंडलिक कचरे, भालेराव, परदेशी उपस्थित होते शहराच्या आसपास डोंगररांग आहे चांगला निसर्ग आहे फिरण्याची उमेद निर्माण झाली आहे अनेकांनी फिरण्यास सुरवात केली मात्र ही घटना दुर्दैवी असून कायम स्मरणात राहील असे  मत नाशिकच्या वैनतेय गिरिभ्रमण संस्थेचे सदस्य गिर्यारोहक प्रशांत परदेशी यांनी व्यक्त केले दोघे गिर्यारोहक गेल्याने  महाराष्ट्रातल्या गिरीरोहकांना दुःख झाले सुरक्षितता आणि सावधता ही ट्रेकच्या दरम्यान पाळले पाहिजे छंदासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी लोकं डोंगरावर जात असतात त्यावेळी अनेकदा स्थळाची माहिती नसल्याने अपघात होत असतात असे मत प्रशांत परदेशी यांनी व्यक्त केले. दोन गिर्यारोहक मित्रांना श्रद्धांजली वाहण्यासाठी यावं लागेल हा दुर्दैवी क्षण आहे डोंगरातील अपघात गंभीर असतात शिस्त, सुरक्षितता आणि प्रशिक्षक या तीन गोष्टींना महत्व आहे एकाला आलेली अडचण दुसऱ्याला सुधारण्याचा पयत्न ही एक मदत असते ट्रेक करतांना सर्व नियम पाळणे आणि त्याचे पालन करणे गरजेचे असल्याचे मत
मुंबईच्या चक्रम हायकर्सचे सदस्य गिर्यारोहक महेश भालेराव यांनी व्यक्त केले या अपघातवेळी ज्यांनी रेस्क्यू ऑपरेशन केले त्या  भागवत झालटे, जनार्दन झालटे  यांनी आपले अनुभव कथन केले झालटे बंधुसह मदत करणारे रापलीचे माजी सरपंच संघरत्न संसारे यांचेही आभार मानण्यात आले गिर्यारोहक प्रवीण व्यवहारे यांनी सूत्रसंचालन केले तर निलेश वाघ यांनी आभार मानले यावेळी पियुष गंगीले, डॉ भागवत दराडे, अमोल खरे, तुषार गोयल, कांतीलाल येणारे, निलेश वाघ, राम महाले, योगेश म्हस्के, संदिप वनवे, नंदकिशोर पगार,  गणेश हडपे, किरण भाबड, संदीप पाटील, प्रशांत सानप, सुषमा तिवारी, सीमा वानखेडे आदी उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघदर्डी येथे डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघदर्डी येथे डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

माध्यमिक विद्यालय वागदर्डी येथे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन डॉ. एपीजे...

read more
नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी...

read more
मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अहिंसा व समतेचे प्रतिक अग्रकुल प्रवर्तक छत्रपति महाराजाधिराज अग्रसेन जी भगवान यांचा...

read more
आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

बारा वर्षानंतर गोदावरी तीरावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा फक्त धार्मिक पर्वणी नाही तर...

read more
मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

कालची मनमाड - अहिल्यानगर रोड वर घडलेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना ताजी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]