Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

माता रमाई जयंतीनिमित्त रौनक फाऊंडेशनच्या वतीने त्वचारोग निदान शिबिर संपन्न.

Feb 8, 2022

रौनक फाऊंडेशनच्या वतीने माता रमाई जयंती साजरी करून त्या निमित्त वसंत नगर येवला रोड तांडा येथे खरूज नावाचा त्वचा रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

रौनक फाऊंडेशनच्या वतीने शहर आणि परिसरामध्ये अनेकवेळा विविध प्रसंगी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत असते.याच समाजसेवेच्या कामाची पावती म्हणुन रौनक फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.वर्षा झाल्टे यांच्यावर नुकतेच नमो फौंडेशनच्या जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रविवारी माता रमाई जयंतीनिमित्त वसंत नगर येथे मोफत त्वचारोग आरोग्य तपासणी मार्गदर्शन आणि मोफत गोळ्या ओषधे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

रौनक फाऊंडेशनचा अध्यक्षा डॉ वर्षा झाल्टे यांनी 25 /30 लहान मुले व इतर 15/20 जणांची तपासणी केली व येथील लोकांमध्ये त्वचेची आणि शरीराची कशीकाळजी घेतली पाहिजे या बद्दल माहिती दिली , तांड्याचे सरपंच व नागरिक यांनी डॉ .वर्षा झाल्टे यांचे मनपूर्वक आभार मानले. या प्रसंगी रौनक फाऊंडेशन सर्व पदाधिकारी , सदस्य आणि गावकरी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]