Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

तुफान वादळाला आपल्या फाटक्या पदरात झेलणारी ताकद म्हणजे माता रमाई : डॉ.कोमल तुपसागर

Feb 8, 2022

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी महामाता रमाई आंबेडकर म्हणजे त्यागमूर्ती व वेदना व क्रांतीचा हुंकार होत्या रमाई म्हणजे तुमच्या माझ्या नव्हे समस्त तर समस्त मानवजातीच्या हृदयातील चिरंतन दिवा,बाबासाहेबांना भिमाचा भीमराव, भिमरावाचा बॅरिस्टर,डॉ. बाबासाहेब आंबेडकर बनवण्यासाठीची शक्ती म्हणजे रमाई तुफान वादळाला आपल्या फाटक्या पदरात झेलणारी ताकद म्हणजे रमाई नऊ कोटी लेकरांना आपल्या पदराच्या पंखाखाली आसरा देऊन मायेची पाखरण घालणारी महाशक्ती म्हणजे रमाई बाबासाहेबांची प्रेरणा शक्ती म्हणजे रमाई शांत आणि नितळ तरीही तेजस्वी बोधिसत्वाची रम्य पहाट म्हणजे रमाई बाबासाहेबांच्या विद्वत्तेची धार म्हणजे रमाई बाबासाहेबांचा हृदयातील मानवतेचे स्फुल्लिंग पेटविणारी मशाल रमाई होत्या असे उदगार डॉ कोमल तुपसागर यांनी काढले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय,राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष येवला
यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाईंच्या १२४ व्या जयंती निमित्त
माता रमाई अभिवादन सभा व जाहीर व्याख्यान कार्यक्रमात सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.कोमल तुपसागर यांचे जाहीर
व्याख्यान संपन्न झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.
अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते महेंद्रभाऊ पगारे हे होते.कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सुरेश खळे,संयोजन मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक शरद शेजवळ यांनी केले.येवला शहर पोलीस स्टेशनचे एपीआय नितीनजी खडांगळे,पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्रचे मा.डॉ.मनोज गवई,जीवन पानपाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कविता पराते,स्मिता झाल्टे डॉ.कंबल मॅडम उपस्थित होते.

मयूर सोनवणे विधाता अहिरे कांताबाई गरुड संदीप भालेराव बिडी खैरनार सर संगीता अहिरे विनोद त्रिभुवन बाळासाहेब आहिरे आशाताई अहिरे,अनिल झाल्टे,संदीप भालेराव,हिरामण मेश्राम,संगीता अहिरे,अभिमन्यु शिरसाठ,सचिन बुढारे,अक्षय गरुड आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार शरद शेजवळ यांनी मानले सूत्रसंचालन मिलिंद गुंजाळ,राजरत्न वाहुळ यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय,राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका व येवला तालुका स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]