मेष:- कलासक्त दृष्टीकोन वाढीस लागेल. मैत्रीचे नवीन संबंध जुळून येतील. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल.
वृषभ :- दिवस मनाजोगा घालवाल. काही गोष्टी जाणीवपूर्वक लपवाल. तुमची उत्तम छाप पडेल.
मिथुन :- मानसिक चंचलता जाणवेल. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.
कर्क :- कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण असेल. गोड बोलून कामे साध्य करता येतील.
सिंह :- इतरांना आनंदाने मदत कराल. इतरांच्या विश्वासास पात्र व्हाल.
कन्या :- काही कामे कमी श्रमात पार पडतील. अचानक धनलाभ संभवतो.
तूळ :- शेअर्स मधून लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी समाधानी राहाल.
वृश्चिक :- संपर्कातील लोकांचा जिव्हाळा वाढेल. इतरांच्या मताचा आदर करावा.
धनू :- खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. फार अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल.
मकर :- मनातून निराशा दूर सारावी. अडथळ्यातून मार्ग काढावा. खर्चाचे योग्य नियोजन करावे.
कुंभ :- मैत्रीत कटुता येणार नाही याची काळजी घ्यावी. उगाच चिडचिड करू नका.
मीन :- कामाच्या ठिकाणी संबंध जपाल. सामाजिक कामात पुढाकार घ्याल.




