Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मुक्तीभूमी वाचनालय व अभ्यासिका बहुजन कष्टकरी विद्यार्थ्यांचे ज्ञान केंद्र बनावे : गायिका कडूबाई खरात

Feb 9, 2022

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाकवी वामनदादा कर्डक यांच्या नावाने सुरू असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय व राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तिभुमी अभ्यासिका हे विद्यार्थ्यांसाठी ज्ञान केंद्र बनावे. भविष्यात मुक्तिभुमी वाचनालय व अभ्यासिका भव्यदिव्य स्वरूपात उभी रहावी, ग्रामीण कष्टकरी शेतकरी शेतमजूर कामगार अशा बहुजन समाजातील सर्व मुला-मुलींना इथून चालना मिळावी यासाठी मी स्वतः व महाराष्ट्रातल्या दानदात्यांनी पुढाकार घेऊन निधी व पुस्तकं दान द्यावेत यासाठी प्रयत्न करेल येवला नगरपरिषद महाराष्ट्र शासनाने,जनतेने सुद्धा ह्या ऐतिहासिक भूमीत सुरू असलेला ज्ञानदानाच्या कार्याला सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गानकोकिळा कडूबाई खरात यांनी केले आहे.
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या शाहिरी गीत कवनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक,आर्थिक,राजकीय आणि सांस्कृतिक परिवर्तन प्रबोधनाचा विचार व धम्म कार्याचा वारसा लोकांमध्ये जाऊन सांगितला त्यांच्या नावाने माझे बंधू शरद शेजवळ सर यांनी स्थापन केलेल्या या वाचनालय व अभ्यासके मुळे बाबासाहेब आंबेडकर व लोककवी वामनदादा कर्डक यांच्या नावाने असलेल्या या एकमेव अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांचे हित साधले जाईल व अशा लोक उपयोगी संस्था व कार्याला बळ मिळेल असा प्रयत्न समाजाने जाणीवपूर्वक करून या कार्याला मदत करावी असे आवाहन कडूबाई खरात यांनी येथील मुक्ती भूमी वाचनालय व अभ्यासिका सदिच्छा भेट देते प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शैलेंद्र वाघ होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्तिभुमी वाचनालय व अभ्यासिकेचे संस्थापक शरद शेजवळ यांनी केले यावेळी अभिमन्यू शिरसाट कवी धम्मा गवई,ज्ञानेश्वर खरात विकास खरात,सपकाळ मास्तर,अक्षय गरुड,सुमित गरुड व अभ्यासिका वसतिगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऐतिहासिक मुक्ती भुमी येवला येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या परिसरात वृक्षारोपण कडूबाई खरात यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी सिद्धार्थ हिरे, सुरेश मामा खळे, शैलेंद्र वाघ शरद शेजवळ, भाऊसाहेब झाल्टे मयूर सोनवणे,सचिन बोधारे,मनोज गुंजाळ, सिद्धार्थ गुंजाळ,आम्रपाली सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजरत्न वाहुळ,आभार वसतिगृहाचे अधीक्षक बी.डी. खैरनार सर यांनी मानले.

अजून बातम्या वाचा..

मनसे महिला आघाडी मनमाड शहर अध्यक्ष पदी सौ.रोहिणी गागरे,उपाध्यक्ष पदी सौ.लता खैरनार

मनसे महिला आघाडी मनमाड शहर अध्यक्ष पदी सौ.रोहिणी गागरे,उपाध्यक्ष पदी सौ.लता खैरनार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या...

read more
नांदगाव तालुक्यातील हिंगणवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत ११० वर्षाच्या आजीबाईने केले मतदान

नांदगाव तालुक्यातील हिंगणवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत ११० वर्षाच्या आजीबाईने केले मतदान

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात आज ग्रामपंचायत निवडणुकांचे मतदान पार पडले,ग्रामपंचायतीच्या...

read more
राष्ट्र सेवा दला,संविधान साक्षरता अभियानच्या वतीने पिंपळगांव बसवंत येथे हर घर संविधान व संविधान संवर्धक-प्रचारक कार्यशाळेचे आयोजन : शरद शेजवळ

राष्ट्र सेवा दला,संविधान साक्षरता अभियानच्या वतीने पिंपळगांव बसवंत येथे हर घर संविधान व संविधान संवर्धक-प्रचारक कार्यशाळेचे आयोजन : शरद शेजवळ

रविवार दिनांक ७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११:४५ ते ३:३० वा. स्व.बी.पी.पाटील कॉलेज ऑफ सायन्स,(पिंपळगांव...

read more
महावितरण यंत्रणेच्या सक्षमीकरण व आधुनिकीकरणावर १४ हजार २६६ कोटींच्या खर्च होणार

महावितरण यंत्रणेच्या सक्षमीकरण व आधुनिकीकरणावर १४ हजार २६६ कोटींच्या खर्च होणार

मुंबई,दि.४ऑगस्ट २०२२: येणाऱ्या काळात वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणला सध्याच्या...

read more
(बघा व्हायरल व्हिडीओ) “नरेंद्र मोदी यांनी कधी चहा विकलाच नाही” ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांचे वक्तव्य

(बघा व्हायरल व्हिडीओ) “नरेंद्र मोदी यांनी कधी चहा विकलाच नाही” ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांचे वक्तव्य

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी सातत्याने केंद्र सरकारच्या कार्यशैलीवर टीका...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]