Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कर्नाटक येथील घटनेचा वंचित बहुजन आघाडी तर्फे निषेध

Feb 10, 2022

मनमाड -कर्नाटक या ठिकाणी अल्पसंख्यांक समाजाच्या महिलांचा पेहरावा हिजाब (हेड स्कार्फ बुरखा)याला काही समाजकंटक विरोध करून मोठ्या प्रमाणे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
करीत असून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचा मागणीसाठी वंचीत बहुजन आघाडी तर्फे भारताचे महामहिम राष्ट्रपती यांना मंडळ अधिकारी मनमाड यांना निवेदन देण्यात आले आहे,
अल्पसंख्यांक समाजाच्या महिलांचा पेहरावा हिजाब (हेड स्कार्फ बुरखा) यास कर्नाटक राज्य मधील समाजकंटक याला विरोध करीत आहे हिजाब (हेड स्कार्फ) धर्मशास्त्राप्रमाणे महिलांना अत्यावश्यक असून, अनेक पिढ्यांपासून अल्पसंख्यांक समाजातील मुली व महिला हिजाब (बुरखा) परिधान करून शाळेत व महाविद्यालयात देखील जात आहे. आजपर्यंत कोणतेही शाळा व विद्यालयांमध्ये हिजाब घालून आलेल्या मुलींना कधीही शाळेमध्ये येण्यास नाकरण्यात आलेले नाही. तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 ते 28 मध्ये देशातील सर्व नागरिकांना त्यांच्या धर्माचे स्वतंत्र दिले आहे. तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम 15 (1)(अ) अन्वे सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आहे. स्वातंत्र्य भारतात आपल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत कुणीही कोणाला कोणते गणवेश घालावे हे कुणीही सांगितलेले नाही, किंवा कोणतेही धर्माचे लोकांनी जे काही गणवेश घातलेले आहे त्याच कधीही विरोध केलेला नाही. परंतु कर्नाटकात मागील काही दिवसापासून संविधानाने दिलेल्या मौलिक अधिकारापासून सामान्य जनतेला विशेष अल्पसंख्यांक मुलींना वंचित ठेवण्याचे काम केले जात आहे. कर्नाटक सरकारचे बेकायदेशीर व भारतीय राज्य घटनेच्या विरोधात जाऊन अशा कृत्यामुळे पूर्ण भारतात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही
प्रत्येकाला आपल्या जातीय धर्माचा अभिमान असावा कोणत्याही धर्माचा तिरस्कार नसावा. कोणत्याही जाती धर्माची स्त्री चे रक्षण करणे हे आपल्या कर्तव्य असून, आपले राज्य हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य असून, छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी स्त्रियांचा सन्मान केला आहे. एकेठिकाणी सरकार हे बेटी पढाव बेटी बचाव हा नारा देत आहे. परंतु दुसरे ठिकाणी एक स्त्री बघून शंभर ते दोनशे समाजकंटक त्या मुलीला बुरख्यात हिजाब पाहून घोषणाबाजी देत आहे. ही आपली भारतीय संस्कृती नाही, तरी अशा समाजकंटकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी व सदर घटनेचा मुस्कान नामक अल्पसंख्यांक मुलीचा चित्रीकरण (VDO) सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे त्या मुलीस हानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, म्हणून सदर मुलीला तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे,कैलास शिंदे,पीआर निळे,संतोष भोसले,ऍड आम्रपाली ताई निकम,कादिर शेख,अनवर मंसुरी,यशवंत बागुल,शकील शेख, आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर शिवसेना महिला आघाडी व युवती सेनेतर्फे आरती दाभाडे सोनवणे हिच्या हत्येचा तीव्र निषेध

मनमाड शहर शिवसेना महिला आघाडी व युवती सेनेतर्फे आरती दाभाडे सोनवणे हिच्या हत्येचा तीव्र निषेध

शिवसेना महिला आघाडी व युवती सेनेतर्फे आज सौ आरती दाभाडी सोनवणे यांच्या मृत्यूचा जाहीर निषेध...

read more
मनमाडच्या लेकीला न्याय मिळावा : दोषींवर कठोर कारवाई करण्याची सर्वपक्षीय मूक मोर्चा द्वारे केली मागणी

मनमाडच्या लेकीला न्याय मिळावा : दोषींवर कठोर कारवाई करण्याची सर्वपक्षीय मूक मोर्चा द्वारे केली मागणी

लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात मनमाड ची कन्या आरती दाभाडे (सोनवणे) हीचा वैजापूर येथे सासरच्यांकडे...

read more
कर्मचाऱ्यांना अद्ययावत करण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची भूमिका महत्त्वाची:संचालक डॉ. नरेश गिते; एकलहरे प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र येथे भेट 

कर्मचाऱ्यांना अद्ययावत करण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची भूमिका महत्त्वाची:संचालक डॉ. नरेश गिते; एकलहरे प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र येथे भेट 

ऊर्जा क्षेत्रात  येणारे नवनवीन तंत्रज्ञान व माहिती,  महावितरण कंपनी समोरील आव्हाने व उपाय तसेच...

read more
कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ओपन लाईन शाखा तर्फे अभिवादन

कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ओपन लाईन शाखा तर्फे अभिवादन

ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी प्रमुख...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]