Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आदित्य सतिश पाटील सी ए परीक्षा उत्तीर्ण

Feb 11, 2022

मनमाड शहरातील प्रतिष्ठित राजकारणी आणि सुप्रसिद्ध व्यावसायीक असलेले श्री सतिश दादा पाटील यांचा मुलगा चि.अदित्य पाटील हा अत्यंत अवघड समजली जाणारी C A ची परीक्षा पास झाला
या पंचक्रोशीत पहिल्यांदाच एक मराठी मुलगा C A झाला, ही बहुजन समाजासाठीच नव्हें तर मनमाडकरांसाठी ही गौरवाची,अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे.
तसेच Whatsapp, Facebook आणि Video Game च्या आहारी गेलेल्या आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी व्हावी

सर्व काहीं प्रतिकूल असताना, त्यातून वर येण्याच्या धडपड हा मानवी स्वभाव

परंतु सर्व सुखे हात जोडून सेवेसी हजर असताना, असे अवघड उद्दीष्ट ठेवून त्यासाठी कठोर मेहनत करणाऱ्यांची संख्या नगण्य
एका वटवृक्षाच्या खाली राहुन आपले अस्तित्व निर्माण करणे ही सुध्दा एक असाधारण गोष्ट आहे
सर्व सुविधांची रेलचेल असतांना त्यात रममाण न होता आपल्या ठरविलेल्या धेय्यासाठी सुयोग्य निवडक साधनांची निवड करून त्याचा वापर आपल्या धेय्य प्राप्तीसाठी करून धेय्य प्राप्त करणे हे सुद्धा मोठे महत्कार्य आहे

स्वतःच्या स्वप्नांसाठी तर सर्वच प्रयत्न करतात परंतु पित्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून ते स्वप्न सत्यात उतरवून पित्याला स्वप्नपूर्तीचे सुख मिळवून देणे म्हणजे हे पित्यासाठी परमभाग्यच..
अशा गुणवान,कर्तुत्ववान व्यक्तीमत्वाचे यश समाजासमोर यावे,
याचा आदर्श बहुजन समाजातील सर्वच तरुणांनी घ्यावा म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकार्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन यांचा यथोचीत सत्कार केला
या प्रसंगी मराठा समाजाचे जेष्ठ श्री हेमंत गवळे,श्री अजय निखाडे,श्री भिमराज लोखंडे,श्री व सौ सतिश पाटील,भास्कर झाल्टे,वैभव जाधव,सुमित गायकवाड, जितेश ठाकरे, साकेत गवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]