Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कर्नाटक येथील घटनेचा मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने निवेदनद्वारे निषेध व न्यायालयीन चौकशीची मागणी

Feb 12, 2022

मनमाड शहर शिवसेनेतर्फे भारताचे महामहीम राष्ट्रपती यांना एक निवेदन देण्यात आले त्याद्वारे कर्नाटक राज्यातील पी यु कॉलेज येथे घडलेली घटना निंदनीय असून त्याचा जाहीर निषेध करण्यात आला सध्या हे प्रकरण न्यायालयीन आहे, यावर योग्य तो निर्णय मा. उच्च न्यायालय, कर्नाटक राज्य देतीलच अशी आंम्हाला खात्री आहे, व न्यायालयीन प्रक्रियेवर आमचा विश्वास आहे, आपल्या भारत देशाचे सार्वभौमत्व भारतीय संविधानावर अवलंबून आहे व त्याचे पालन करणे प्रत्येक भारतीयांवर बंधनकारक आहे. या ठिकाणी महत्वाची बाब म्हणजे या सर्व घटनेमागे एखादे राजकीय, अराजकीय, धार्मिक, सामाजिक असे काही संघटन किंवा व्यक्ती समूह यांचा समावेश आहे का? या संदर्भात चौकशी झाली पाहिजे कारण कु. मुस्कान या विद्यार्थिनीने एका राष्ट्रीय न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले आहे की सदर घटनेच्या दिवशी परिसरातील प्रदर्शनकर्त्यांपैकी 10 टक्केच विद्यार्थी कॉलेजमधील होते तर इतर सर्व बाहेरील व्यक्ती होते, यावरून सिद्ध होते की यात मोठे षडयंत्र आहे, कॉलेज परिसरातील प्रशासन, प्राध्यापक, कर्मचारी, यांच्या जागरूक पणामुळे काही अनुचित प्रकार घडला नाही, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.
शाळा,कॉलेज, हे शिक्षणाचे पवित्र स्थान आहे व विद्यार्थी हे साधक आहे अशा ठिकाणी जर वाद-विवाद होऊन त्याचे रूपांतर धार्मिक विषमता,हिंसा निर्माण होत असेल तर ही अतिशय चिंताजनक व गंभीर बाब आहे तर सदर प्रकार देशातील एकता व अखंडतेला शोभनीय नाही, तरी या संपूर्ण घटनेवर एक न्यायालयीन चौकशी समिती गठीत करून उपद्रव कर्त्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मांगणीसाठी मनमाड शहर शिवसेना व शिवसेना महिला आघाडी तर्फे भारताचे महामहिम राष्ट्रपती यांच्या नावानें निवेदन मनमाड शहर सहायक पोलीस निरीक्षक मा. प्रल्हाद गिते साहेब यांना महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ विद्याताई जगताप, सौ नाझमा जाफर मिर्झा यांच्या हस्ते देण्यात आले आहे, या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष। बळीद, युवासेना जिल्हा अधिकारी फरहानदादा खान, जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, शिवसेना उपशहरप्रमुख जाफर मिर्झा, युवासेना उपजिल्हा अधिकारी मुन्नाभाऊ दरगुडे, उपतालुक प्रमुख सुभाष माळवतकर, दिनेश केकाण, कैलाश भाबड, युवासेना शहरप्रमुख आमीन पटेल, नगरसेवक लियाकत शेख, उपजिल्हा संघटक सौ संगीता बागुल उपजिल्हा प्रमुख महिला आघाडी, लीलाताई राऊत, अन्नपूर्णा अडसुळे, कयाम सैय्यद, शहरसंघटक मुराद शेख, महेंद्र गरुड, वाहतुकसेना शहरप्रमुख अमजद शेख, शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष तालुका संघटक विकास वाघ, राहील मंसुरी, काशिफ शेख, आयाज शेख, रियाज शेख, रिजवान कुरेशी, ललित रसाळ, कृष्णा जगताप, अब्दुल रउफ शेख आदीं शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]