मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार आहे. अशी मोठी घोषणा छत्रपती संभाजीराजेंनी केली आहे.2007 पासून मी संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा समाज देखील वंचित घटक आहे. त्यासाठीच आरक्षणाची भूमिका घेतली.मी मराठा आहे म्हणून मराठा आरक्षणासाठी लढतो आहे असं नाही. मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलनं केली. परंतू अजूनही कोणतीच मागणी पूर्ण झाली नाही.तसेच सरकार काहीच हालचाल करतं नाही. त्यामुळे माझी भूमिका आहे की आता 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे त्यांनी सांगितल आहे.दरम्यान, मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अनेक दिग्गजांच्या भेटी घेतल्या असून मराठा आरक्षणासाठी पुढील वाटचाल कशी असणार आहे याबाबतची दिशाही ते आज ठरवणार आहेत.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; पहिल्याच दिवशी दोन्ही मतदारसंघात एकूण तीन अर्ज दाखल
नाशिक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता नाशिक जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या...








