loader image
[ays_poll id=7]

रेल्वेतील खाद्य सेवा पुन्हा १०० टक्के क्षमतेने सुरू होणार

Feb 15, 2022


रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठीही आनंदाची बातमी आहे. आजपासून म्हणजेच 14 फेब्रुवारीपासून आयआरसीटीसी (IRCTC) सर्व ट्रेनमध्ये प्रवाशांना खाद्यसेवा पुरवणार आहे. याबाबतची माहिती रेल्वेकडून (Indian Railways) देण्यात आली आहे.

भारतीय रेल्वेमध्ये आयआरसीटीद्वारेच खाद्यसेवा पुरवली जाते. आयआरसीटी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन आणि देशभरातील कोरोना लॉकडाउन निर्बंध कमी करत ट्रेनमध्ये अन्न शिजवून ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास सज्ज झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 23 मार्च 2020 रोजी खाद्यसेवा बंद करण्यात आली होती.

रेल्वे बोर्डाकडून मिळालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रवाशांचे आरोग्य लक्षात घेऊन शिजवलेले अन्न पुन्हा सुरू करण्याचा निर्णय अत्यंत सावधगिरीने घेण्यात आला आहे. आतापर्यंत 80 टक्के गाड्यांमध्ये खाद्यसेवा सुरू करण्यात आली आहे. आता ती १०० टक्के क्षमतेनं सुरू करण्यात येणार आहे. आयआरसीटीसीद्वारे दिवसभरात लाखो लोकांना खाद्यसेवा पुरवली जाते.

आयआरसीटीसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही सेवा रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 428 ट्रेनमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली होती. तर 21 डिसेंबरपर्यंत एकूण संख्येच्या 30 टक्के ही सेवा सुरू करण्यात आली होती. 22 जानेवारीपर्यंत 80 टक्के आणि 20 टक्के उर्वरित सेवा ही 14 फेब्रुवारी 2022 पर्यंत सुरू केली जाणार आहे. राजधानी, शताब्दी, दुरंतोसारख्या प्रीमिअम ट्रेन्समध्ये ही सेवा यापूर्वीच सुरू करण्यात आली होती.

23 मार्च 2020 रोजी कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून खाद्यसेवा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये होणारी घट पाहता काही कालावधीनंतर ही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली होती. कोरोनाच्या प्रोटोकॉलमुळे ट्रेनमध्ये शिजवलेलं अन्न देणे बंद करण्यात आले होते. त्यामुले खासगी कंपन्यांद्वारे प्रवाशांना खाद्यसेवा पुरवली जात होती. इतकंच नाही, तर पेंट्रीकारमध्येही अन्न शिजवण्यास मनाई करण्यात आली होती. यामुळे रेल्वेलाही मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागले होते. परंतु आता सेवा पूर्ववत केल्यामुळे प्रवाशांना गरम आणि दर्जेदार जेवणाचा आनंद घेता येणार आहे.


अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.