Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आरोग्य तपासणी शिबिरात १३५ कामगारांची तपासणी

Feb 15, 2022

मनमाड नगरपरिषदेतील कर्मचा-यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून वैद्यकिय तपासणी होणे आवश्यक असल्याने तसेच कामगारांच्या आरोग्यची काळजी घेत असतांना बिर्ला आय हॉस्पीटल, नाशिक व अशोका मेडी कव्हर हॉस्पीटल, नाशिक यांच्या संयुक्‍त विद्‌यमानाने तसेच महाराष्ट्र नगरपरिषद कर्मचारी- संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने आज दि. 15.02.2022 रोजी संघटना प्रमुख्य
श्री. विश्वनाथजी घुगे साहेब, (हिंगोली) यांचे वाढदिवसाचे औचित्त्य साधून मनमाड नगरपरिषद कार्यालयात नेत्ररोग तपासणी, हदयरोग तपासणी, तसेच वैद्यकिय मार्गदर्शनाचे शिबीर आयोजित करण्यांत आले असता. अशोका मेडी कव्हर हॉस्पिटलचे डॉ.श्री. साळवे यांनी कामगारांना वैद्यकिय मार्गदर्शन केले.तसेच बिर्ला व अशोका हॉस्पीटलचे सर्व डॉक्टर्र्स आणि मेडीकल स्टॉफ चे महाराष्ट्र नगरपरिषद कर्मचारी- संवर्ग कर्मचारी संघटनेच्या मनमाड शाखेच्या वतीने आदर सत्कार करण्यांत आला. तसेच नगरपरिषदेत कार्यरत इतर संघटनेच्या पदाधिकारी- प्रतिनिधींचा सत्कार समारंभ नगरपरिषदेचे कार्यालयीन पर्यवेक्षक श्री. अशोक पाईक यांचे प्रमुख्य उपस्थितीत करण्यांत आला. या प्रसंगी मनमाड नगरपरिषटैत अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने जवळपास 135 ते 136 कर्मचारींनी सदरहू वैद्यकिय शिबीराचा लाभ घेत आरोग्य तपासणी / चाचण्या करवुन घेतल्या आहेत. सदरहू कार्यक्रमासाठी नगरपरिषदेतील कार्यरत श्री. अमृत काजवे, न.प.अभियंता, श्री.नाना जाधव, लेखापाल, श्रीमती खराटे मॅडम, अंतर्गत लेखापरिक्षक, श्री. शरद बोडके, कर अधिक्षक, श्री. आनंद औटी, व इतर कर्मचारी उपस्थित होते. त्याच प्रमाणे महाराष्ट्र नगरपरिषद कर्मचारी- संवर्ग कर्मचारी संघटनेचे श्री. किरण आहेर, राज्यउपाध्यक्ष, श्री. प्रमोद सांगळे, शाखा अध्यक्ष, मनमाड न.प., श्री. दिपक पांडे, श्री. तुषार बोराडे, श्री. कैलास पाटील, श्री. किरण कवडे,श्री. जावेद शेख, श्री. संतोष चव्हाण, श्री. संजय देवडे, श्री. संजय नरोटे, श्री. लक्ष्मण चव्हाण, श्री. किशोर व्यवहारे, श्री. बाबासाहेब दराडे, श्री. अशोक कटारे, श्री. मिलींद गांगुर्डे, श्री. पृथ्वीराज कोळगे, श्री. संजय आरोटे, श्री. सुनिल दराडे, श्री.मिलींद पुरंदरे, श्री. सखाराम गवळी, व इतर कर्मचारींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. यावेळी मनमाड नगरपरिषद प्रशासनाने केलेल्या सहकार्यबददल नगरपरिषदेचे मा.मुख्याधिकारी, श्री. सचिनकुमार पटेल यांचेसह प्रशासनाचे व कामगारांचे संघटनेच्या वतीने श्री. किरण आहेर, राज्यउपाध्यक्ष, श्री. प्रमोद सांगळे, शाखा अध्यक्ष, मनमाड न.प., यांनी जाहिर आभार व्यक्‍त केले.

अजून बातम्या वाचा..

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]