मेष :- नवीन मित्र जोडले जातील. आपला दबदबा निर्माण कराल.
वृषभ :- कुटुंबात तुमचे वर्चस्व राहील. तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जाईल.
मिथुन :- विचारात एकसूत्रता आणावी लागेल. एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.
कर्क :- कौटुंबिक वातावरण हसते खेळते असेल. तुमच्या मताचा आदर केला जाईल.
सिंह :- तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. लोक तुमच्याकडे आकर्षिले जातील.
कन्या :- कामाच्या ठिकाणी कुशाग्र बुद्धीचा वापर कराल. कामातून समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा.
तूळ :- कर्तबगारीला चांगला वाव मिळेल. तुमच्यातील महत्वाकांक्षा वाढीस लागेल.
वृश्चिक :- पैशांची उधळपट्टी टाळावे. कर्तृत्व दाखवण्याची संधी सोडू नका.
धनू :- क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. आपली बुद्धिमत्ता दाखवण्याची संधी मिळेल.
मकर :- बोलण्याच्या भरात जबाबदारी घेण्याचे टाळावे. सामुदायिक वादात सहभाग घेऊ नये.
कुंभ :- बौद्धिक ताण राहील. कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा.
मीन :- गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.




