Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

तब्बल ४७ वर्षांनी एकत्र येत त्यांनी दिला शाळेतील आठवणींना उजाळा

Feb 16, 2022

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सर्वात आनंदाने जगता येणारे आयुष्य हे त्याचे शालेय जीवन असते. विद्यार्थी अवस्थेत असतांना नको-नको से वाटणारे परंतु जेव्हा माणूस हा मोठा होऊन सर्व सामान्य आयुष्य जगत असतो तेव्हा हवे-हवे से वाटणारे म्हणजे शालेय जीवन हे होय.प्रत्येक माणसाच्या आठवणीत त्याची शाळा आणि त्या शाळेत विद्यार्थी असतानाचे प्रत्येक क्षण हे कायम स्मरणात राहतात.अशीच एक आठवणींची शाळा तब्बल 47 वर्षांनी भरविण्यात येऊन सर्व आपल्या वयाची 60 वर्ष पार केलेले विद्यार्थी आज एकमेकांना एकत्र येऊन भेटले.निमित्त होते म.रे.मा.विद्यालय (इंडियन हायस्कुल) च्या असणाऱ्या मॅट्रिक रद्द होऊन एस.सी.सी. सुरू होणाऱ्या दहावीच्या 1975 च्या पहिल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह संमेलनाचे.वयाच्या 16 ते 17 व्या वर्षी आपली दहावी पुर्ण होऊन आप-आपल्या आयुष्यात आपले कर्तव्य आणि जबाबदारी पुर्ण करतांना वेगळे झालेले मित्र-मैत्रीणी आज पुन्हा आजी-आजोबा झाल्यानंतर एकमेकांना पुन्हा भेटले , यातील कित्येकांनी तर एकमेकांना तब्बल 47 वर्षांनी पाहिले होते.प्रत्येकाचा पेहेराव , रूप बदललेलं सर्वजण आपली एकमेकांना ओळख करून देत पुन्हा शाळेच्या आठवणीत रममाण होत होते.ज्या काळात यांचे शालेय जीवन पुर्ण झाले तेव्हा ना मोबाईल होता नाही इंटरनेटची सुविधा त्यामुळे कोणाचाही संपर्क हा कित्येक वर्षांपासून नव्हताच , शाळेच्या मदतीने शाळेचे रेकॉर्ड तपासुन काही मित्रांनी त्या वेळेस शाळेत असणाऱ्या आपल्या सोबत असणाऱ्या सवंगडयांची नावे शोधुन त्यांना संपर्क करून दोन दिवसांच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन केले.दिवस ठरला प्रत्यक्षात 75 शालेय मित्र मनमाड येथे एकत्र आले पहिल्या दिवशी सायंकाळी सर्वजण अनेक वर्षांनंतर प्रत्यक्ष भेटत होते , आप-आपली ओळख आपल्या मित्र परिवाराला करून देत असताना त्यांचा चेहेऱ्यावर आनंद दिसुन येत होता , रात्री एकत्रित जेवण आणि शेकोटी सह हुरडा पार्टीचे आयोजन करून अनेक खेळ , डान्स करून सर्व मित्र पुन्हा एकदा आपल्या वयापेक्षा लहान होऊन या क्षणाचा आनंद घेत होते. आता या सर्वांना ओढ लागली होती ती दुसऱ्या दिवसाची ज्या शाळेत सर्व शिकले , त्यांना संस्कार मिळाले आणि हे सर्व एकत्र आले त्या आपल्या म. रे.मा विद्यालय शाळेला भेट देण्याची आणि तो दिवस उजाडला सर्व मित्र परिवार आपल्या शाळेकडे निघाले शाळेच्या मुख्याध्यापिका , संस्था चालक आणि शिक्षकांनी या आपल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले .आपल्या शाळेला बघुन सर्वजण आपल्या शाळेच्या आठवणी मध्ये 47 वर्ष मागे गेले होते , आपल्या शाळेचे वर्ग प्रत्यक्ष बघुन या वर्गामध्ये पुन्हा विद्यार्थी होऊन बसण्याची सर्वांची इच्छा होत होती , आपले शिक्षक , शाळेच्या त्या जुन्या आठवणींनाचा पट पुन्हा एकदा सर्वांना आठवत होता सर्व मित्र आपल्या जुन्या आठवणींनी अगदी भारावुन गेले होते , अनेकांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती .सर्व मित्र हे आपल्या शालेय जीवनातील आनंदाचा प्रसंग पुन्हा अनुभवत होते. शाळेतील या आपल्या आठवणींची शिदोरी घेऊन शाळेसमोर आपले समुह छायाचित्र घेऊन सर्वजण पुढील कार्यक्रमासाठी पल्लवी मंगल कार्यालय येथे जमा झाले . येथे सर्वांचे ढोल-तशाचा गजरात हार , गुलाब पुष्प , फेटा , शेला ,सन्मान चिन्ह देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आला .यावेळी उपस्थित सर्वांनी आपली आणि आपल्या परिवाराची ओळख देऊन आपल्या शाळेच्या आठवणी आणि अनुभव संगीतले , या प्रसंगी अनेकांच्या अनुभवा वेळी उपस्थित सर्वजण भावुक झाले होते. तब्बल 47 वर्षांच्या या भेटीनंतर सर्वांना पुन्हा एकदा आपले मित्र भेटल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर तो आनंद झळकत होता , पुन्हा एकदा सर्व एकत्र भेटण्याचे आश्वासन देऊन आणि या दोन दिवसांचे सोनेरी क्षण आपल्या ऋदयात साठवुन या सर्व मित्रांना एकमेकांची रजा घेतली .

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्राचे  उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते वृक्ष लागवड

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते वृक्ष लागवड

हरनुल ता.चांदवड येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त...

read more
नांदगाव नगरपालिका प्रशासनाचे चांडक प्लॉट रहिवाशींसह इतर परिसराच्या समस्येकडे दुर्लक्ष असल्याचा नागरिकांचा रोष लोकशाही पद्धतीने उपोषण करणार..!

नांदगाव नगरपालिका प्रशासनाचे चांडक प्लॉट रहिवाशींसह इतर परिसराच्या समस्येकडे दुर्लक्ष असल्याचा नागरिकांचा रोष लोकशाही पद्धतीने उपोषण करणार..!

नांदगाव सोमनाथ घोगांणे गेल्या दोन वर्षांपासून सतत निवेदन देऊन सुध्दा समस्या सुटत नसल्यामुळे या...

read more
मनमाड महाविद्यालयातील माजी विद्यार्थी रोहित राजेंद्र दंडगव्हाळ यांची एम.पी.एस.सी. मार्फत कर सहाय्यक व मंत्रालयात महसूल सहाय्यक पदांसाठी निवड

मनमाड महाविद्यालयातील माजी विद्यार्थी रोहित राजेंद्र दंडगव्हाळ यांची एम.पी.एस.सी. मार्फत कर सहाय्यक व मंत्रालयात महसूल सहाय्यक पदांसाठी निवड

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड मधील माजी विद्यार्थी...

read more
येवल्यातील पारख पतसंस्थेतील २२ कोटी रुपयांच्या फसवणुकीतील संशयित अजय जैन सह एकाला मनमाड शहरातून अटक – चार दिवसांची कोठडी

येवल्यातील पारख पतसंस्थेतील २२ कोटी रुपयांच्या फसवणुकीतील संशयित अजय जैन सह एकाला मनमाड शहरातून अटक – चार दिवसांची कोठडी

मनमाड - येवल्यातील (कै.) सुभाषचंदजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी...

read more
“हिरवी वनराई – हिरवी बेटे” उपक्रमांतर्गत शंभर वृक्षांचे रोपण – मनमाड बचाव कृती समितीचा पुढाकार

“हिरवी वनराई – हिरवी बेटे” उपक्रमांतर्गत शंभर वृक्षांचे रोपण – मनमाड बचाव कृती समितीचा पुढाकार

मनमाड - "हिरवी वनराई- हिरवी बेटे" ही संकल्पना अनोखी असून मनमाड शहराला हरित मनमाड बनविण्याबरोबरच...

read more
विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर उपाययोजना कराव्यात – मनमाड शहर शिवसेनेचे म. गांधी महाविद्यालयास निवेदन

विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर उपाययोजना कराव्यात – मनमाड शहर शिवसेनेचे म. गांधी महाविद्यालयास निवेदन

मनमाड येथील म.गांधी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण व शहरातील विद्यार्थिनींना होणारा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]