Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहरात मराठा समाजाचे आमरण उपोषण

Feb 18, 2022

मराठा समाज्याच्या प्रलंबित मागण्यासाठी युवराज संभाजीराजे छत्रपती आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करणार आहेत,युवराज संभाजीराजे सोबत या लढ्यात सहभागी होण्याकरिता दि 26 फेब्रुवारी 2022 रोजी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी व कुटुंबातील सर्व सदस्य मनमाड येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आमरण उपोषणाला बसणार असुन अन्न त्याग आंदोलन करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे,
महाराष्ट्राचे आराध्य दैवत लोक कल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज व आरक्षणाचे जनक राजर्षी शाहु महाराज यांच्या वंशजासआर्थिक व शैक्षणीक मागास मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ या महाराष्ट्र शासनाने आणल्यामुळे महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध या वेळी नोंदवण्यात आला.या बाबतचे निवेदन मनमाड शहर मंडल अधिकारी श्री संदिपजी काकड साहेब व मनमाड शहर पोलीस ठाणे पो.निरीक्षक श्री प्रल्हाद गिते साहेब यांना देण्यात आले.निवेदनावर सुरेखाताई धुमाळ, सुवर्णाताई निकम, संध्याताई गवळे,लक्षीताई लोखंडे, प्रतिभाताई चव्हाण, सुरेखा झाल्टे,नानासाहेब घुमरे, विनोद डमरे,रविंद्र नाठे,वैभव जाधव,विष्णु चव्हाण, भिमराज लोखंडे, भास्कर झाल्टे यांच्या सह्या आहेत.

अजून बातम्या वाचा..

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

माघी श्री महागणेश जन्मोत्सव निमित्ताने 1997 पासून अखंडितपणे सलग 29 व्या वर्षी यंदाही शनिवार दिनांक...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

  मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]