Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

जलसंवर्धन आणि श्रमसंस्काराचे महत्त्व समजलेल्या मनमाड महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर संपन्न

Feb 18, 2022

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर शिंगवे (मतोबाचे) येथे दिनांक ११/२/२०२२ ते १७/०२/२०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात १२५ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. या शिबिराचा समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.फहिम कुरेैशी, महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या श्रीमती अलकाताई शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला शिंगवे गावच्या सरपंच सौ. नीता पाटील, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम आवारे, जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिका लीला सोनवणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या सात दिवशीय श्रमसंस्कार शिबिरामध्ये विशेष श्रमदान केलेल्या स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात आला. या शिबिरादरम्यान दत्त मंदिर टेकडीवर ६७ सीसीटी चर, शालेय परिसराची व मंदिराची स्वच्छता, माझी वसुंधरा व प्लॅस्टिकमुक्ती संदर्भातली जनजागृती रॅली, दत्तक गावाच्या इतिहासाचा अभ्यास व सर्वेक्षण, ग्रामविकास सर्वेक्षण यासारख्या विविध उपक्रमांवर श्रमसंस्कार व जनजागृती करून शिबीर यशस्वी झाले. यावेळी आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व प्रामुख्याने ‘युवकांमध्ये खरे श्रम संस्काराचे महत्त्व समजावणारी योजना म्हणजे एनएसएस’, ‘देश घडवण्यासाठी वाचन संपन्न, इच्छाशक्ती संपन्न व कार्यसंपन्न युवकांची आज आवश्यकता आहे, यासाठी युवकांनी अशा योजनांमध्ये सहभागी व्हावे’ यावर भर देण्यात आला . यावेळी उपप्राचार्य डॉ. पी.जी. आंबेकर, पर्यवेक्षक डॉ.सतीश तांबे, कुलसचिव समाधान केदारे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. बी. परदेशी, डॉ गणेश गांगुर्डे, प्रा. सौ. वर्षाराणी पेढेकर,प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी गुंडगळ, महेश महाले व कांचन बर्डे यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरात भाजपा च्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती साजरी

मनमाड शहरात भाजपा च्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती साजरी

मनमाड - भाजपा मनमाड शहर मंडला च्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 197 व्या...

read more
नांदगाव बाजार समिती सचिवाचीं बोलठाण येथील व्यापारी  बांधवाना दमबाजी. प्रहार शेतकरी संघटनेचे संदिप सुर्यवंशी यांनी केला जाहीर निषेध

नांदगाव बाजार समिती सचिवाचीं बोलठाण येथील व्यापारी  बांधवाना दमबाजी. प्रहार शेतकरी संघटनेचे संदिप सुर्यवंशी यांनी केला जाहीर निषेध

नांदगाव  सोमनाथ घोंगाणे नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील व्यापारी बांधवाना नांदगाव बाजार...

read more
फलक रेखाटन फलक रेखाटनातून आपणा सर्वांना गुढीपाडवा सणाच्या , मराठी नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा !

फलक रेखाटन फलक रेखाटनातून आपणा सर्वांना गुढीपाडवा सणाच्या , मराठी नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा !

  फलक रेखाटन - देव हिरे.(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव....

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]