Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

विवेकानंद नगर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Feb 19, 2022

विवेकानंद नगर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. हरिभाऊ देवरे  होते.तसेच प्रभाग क्र.४ मधिल सर्व उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रा. श्री प्रवीण मोरे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी वातावरणात उत्साह संचारला. शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण जगामध्ये साजरी केली जाते. ते केवळ मराठ्यांचेच नाही तर सर्व जाती धर्माचे राजे होते आजच्या तरुण पिढीने टीव्हीवरील कलाकारांचा आदर्श डोळ्यापुढे न ठेवता छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून समाज कार्य करावे. असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. अध्यक्ष देवरेंनी प्रत्येक घरावर आज भगवा झेंडा फडकला पाहिजे आपल्याला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान वाटला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना मा. विभाग प्रमुख श्री शैलेश सोनवणे व सौ.शिल्पा शैलेश सोनवणे यांनी केले
कार्यक्रमाला श्रीराम चौधरी, दिलीप संगपाळ, बिडगर नाना, संजय बच्छाव,
अशोक शिंदे, नटेश गरुड, घनश्याम जाधव, विजय सांगळे, शिरीष सोनवणे, हरिभाऊ देवरे, विनायक बापट, प्रविण मोरे, औशिकर आप्पा, गवळी आप्पा, सुभाष राऊत,
संजय थोरात, जाधव दादा, भास्कर शिरसाठ, मुसमुंड़े सर, राहुल जाधव, कुणाल सोनवणे, पठाडे काका, सतिश गोसावी, तुषार शिंदे, शिवाजी बिड्गर, भोसले तात्या, तसेच अनेक मान्यवर व बाल शिव भक्त मोठ्या संखेने उपस्थित होते…

अजून बातम्या वाचा..

बालविवाह : स्थानिक लोकप्रतिनिधीचे पद रद्द करण्यात यावे – राज्य महिला आयोगाची मागणी

राज्यात कोरोना काळात बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी राज्य महिला आयोग सक्रिय...

read more

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज चा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आंदोलनाला पाठिंबा!

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड व नाशिक रोड तर्फे महाराष्ट्र राज्य परिवहन...

read more

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभा चे नेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांना स्मृतिदिनी अभिवादन!

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते, स्वातंत्र्य सेनानी, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे नेते,...

read more

सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे महामंत्री डॉ प्रविण वाजपेयी यांची मनमाड रेल्वे स्टेशन ला भेट !

सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे महामंत्री डॉ प्रविण वाजपेयी हे मनमाड येथे कार्यकर्त्यांना संबोधित...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]