महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर शाखेतर्फे शहर अध्यक्ष सचिन शिरुड यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाचा कार्यक्रम येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर संपन्न झाला. नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अनंत सांगळे व जिल्हा महिला अध्यक्षा सौ.स्वातीताई मगर व विधानसभा अध्यक्ष सुनील कोल्हे तालुकाध्यक्ष राजू तरंगे,नाना आहेर, उपस्थित होते. जिल्हा उपाध्यक्ष अनंत सांगळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. जफर शेख, पवण दराडे, झाकीर पठाण,संदीप पांडव,शैलेश गवांदे,शंकर आंधळे, बंटी ओहोळ,सम्राट शेळके,नितीन शिरूड,रोहित दराडे,आशा पठाण, सुरेखा पगारे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 14 जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील मयुर शिंदे व रजा शेख यांची अर्धशतकीय खेळी युवराज शर्माचे 4 बळी
गुरुवार 28 डिसेंबर 23 रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट असोसिएशन आयोजीत...











