Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात जागतिक सामाजिक न्याय दिवस साजरा

Feb 22, 2022

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महिला विकास कक्षाच्या वतीने जागतिक सामाजिक न्याय दिवस दृकश्राव्य व्याख्यानाने साजरा करण्यात आला.
प्रा. डॉ. एन.एन.
गाढे ,अर्थशास्त्र विभाग प्रमुख , लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, पंचवटी नासिक यांचे या प्रसंगी व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी जागतिक सामाजिक न्याय दिवस : महत्व व गरज या विषयावर अभ्यासपूर्ण व मौलिक विचार मांडले. त्यांनी जगातील वेगवेगळ्या देशातील स्वातंत्र्य लढे, वांशिक भेद, आर्थिक विषमता ,लिंगभेद, धर्मभेद, जातिभेद या सर्व गोष्टींचा मागोवा घेत सद्य परिस्थितीत या गोष्टींबद्दल जाणीव जागृती करण्याची नितांत गरज आहे असे प्रखरतेने नमूद केले. पावर पॉइंट सादरीकरण करून त्यांनी अतिशय मुद्देसूद विवेचन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आंबेकर होते.आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी शिक्षण क्षेत्राच्या द्वारे आपण जाणीव जागृती करू शकतो व मोठ्या प्रमाणात सामाजिक न्याय व वेगवेगळे भेद कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो असे प्रतिपादन केले. अशा प्रकारचे वेगवेगळे दिवस साजरे करून विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींचा आपण परिचय करून देऊ शकतो व त्याचबरोबर त्यांची वैचारिक पातळी उंचावू शकतो असे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभवी वाजे व नूतन वाघ या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास कक्षाच्या अध्यक्षा प्रा.सौ कविता काखंडकी व आभार प्रदर्शन प्रा. श्रीमती वर्षाराणी पेढेकर यांनी केले. कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती ज्योती पालवे, कुलसचिव समाधान केदारे, यांनी सहभाग नोंदवला .त्याचबरोबर चिखली येथून डॉक्टर महाजन व नासिक येथील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक यांनी सहभाग नोंदवला. महाविद्यालयाच्या महिला विकास समितीच्या सर्व सदस्या, सर्व प्राध्यापक वर्ग, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी मोठा सहभाग नोंदवला.

अजून बातम्या वाचा..

नांदुरीहून परतणाऱ्या मनमाड आगाराच्या बस ला अपघात – महिला बस कंडक्टर सह दोहोंचा चा मृत्यू,अनेक प्रवाशी जखमी

नांदुरीहून परतणाऱ्या मनमाड आगाराच्या बस ला अपघात – महिला बस कंडक्टर सह दोहोंचा चा मृत्यू,अनेक प्रवाशी जखमी

मनमाड - मनमाड आगाराच्या नांदुरी मनमाड बसला मतेवाडी ता चांदवड शिवारात भिषण अपघात झाला असून अपघातात...

read more
बघा व्हिडिओ – लासलगाव बाजार समिती मध्ये कांदा अनुदान फॉर्म स्वीकारण्यासाठी विशेष कक्ष

बघा व्हिडिओ – लासलगाव बाजार समिती मध्ये कांदा अनुदान फॉर्म स्वीकारण्यासाठी विशेष कक्ष

आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगांव येथील सदस्य सचिव नरेंद्र वाढवणे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]