बुधवार २३ फेब्रुवारी रोजी येथील रोटरी क्लब मनमाड आणि भूमी क्रिकेट क्लबच्या संयुक्त विद्यमाने मनमाड शहरातील खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा या उद्देशाने १७ वर्ष वयोगटा आतील खेळाडूंसाठी बॉक्स टर्फ क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन कु.नाबिया इरफान मोमीन हीचा शुभ हस्ते करण्यात आले. या प्रसंगी इरफान मोमीन,भूषण शर्मा,कौशल शर्मा,जावेद शेख सर, मनोज ठोंबरे सर,शेख रब्बानी सर,राहुल साबळे, सनी पाटील,विक्रम साहू,ऋषी दराडे, सनी फसाटे,सोहेल शेख,कलश पाटेकर,रुद्र पाटेकर,आकाश वाघमारे, रोहित पवार आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक इम्रान मोमीन यांचे कडून ११०००/ – तर द्वितीय पारितोषिक ५००१/- रोटरी क्लब मनमाड तर्फे ठेवण्यात आले आहे. सूत्रसंचालन मनोज ठोंबरे सर आणि शेख रब्बानी सर यांनी केले.
राशी भविष्य : १४ ऑगस्ट २०२५ – गुरुवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...









