loader image
[ays_poll id=7]

बजाज ऑटो कंपनीत नेमिनाथ जैन संचलित तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांची निवड

Feb 25, 2022


नेमिनाथ जैन संचलित श्री एच एच जे बी तंत्रनिकेतनमध्ये प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. या ड्राईव्हमध्ये विद्यार्थ्यांमधील अंगभूत गुण, कौशल्य, आत्मविश्वास, दूरदृष्टी, तांत्रिक ज्ञान या गुणांची पारख करून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये मेकॅनिकल विभागाच्या १४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये पठाण अनम राजू , गांगुर्डे चेतन, जालगुंडे अंकुश कैलास, तिडके शिवम ज्ञानेश्वर, बिंड स्वस्तिक जीतलाल, ठाकरे पंकज दत्तात्रेय, रकिबे पवन संजय, जाधव तेजस राजेंद्र, पवार तेजस मानिक, गवळी मितेश पुंजाराम, आहिरे योगेश नंदकिशोर, संधान दुर्गेश लक्ष्मण, कोतवाल साक्षी प्रकाश व महाले ऋतुजा या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिपारमेंटची विद्यार्थीनी केकन शृती रामदास ची निवड करण्यात आली. या कामगिरीचे श्रेय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. वानखेडे तसेच सर्व विभागांचे विभागप्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच टीपीओ म्हणून काम पाहत असणारे श्री वाय. एल. काकुस्ते, श्री जि. जे.पगार व श्री जी.ए. आरखडे यांना जाते. विविध नामांकित कंपन्यांमध्ये या शैक्षणिक वर्षात ६१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. व्यवस्थापनामार्फत सर्व यश संपादित विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा.श्री बेबीलालजी संचेती व विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष मा. श्री दिनेशजी लोढा, मानद सचिव मा.श्री जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष मा.श्री अजीतकुमारजी सुराणा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनाचे समन्वयक श्री अरविंदकुमारजी भन्साळी, सह मानद सचिव मा.श्री. झुंबरलालजी भंडारी व तंत्रनिकेतनाचे मुख्य समन्वयक तथा प्रबंध समिती सदस्य, श्री राजेद्रकुमारजी बंब यांनी या प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजनाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले .


अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.